Just another WordPress site

राज्यात पुढचे पाच दिवस मान्सूनची जोरदार ‘बॅटिंग’, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई: गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जणूकाही रुसून बसलेला पाऊस अखेर अवतरला असून पुढचे पाच दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तो सक्रिय राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून (Colaba Observatory वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. (Heavy ‘batting’ of monsoon in the state for the next five days, forecast by the Meteorological Department)

यासंदर्भात पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar)यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये होसाळीकर यांनी मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेला तक्ताच शेअर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कधी आणि किती प्रमाणात पाऊस पडेल, याविषयीचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी रात्रीच महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनने हजेरी लावली. आज सकाळपासून पुणे, मुंबईत पावसाच्या सरी बरसल्या आणि नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून येत्या पाच दिवसांत मनसोक्त कोसळणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाचा अंदाज
के. एस. होसाळीकरांनी केलेल्या ट्विटमध्ये कोकण व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर असेल, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

१. रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळणार, खासगी लष्कराने केली पुतीन यांच्याविरोधात बंडखोरी  

बीटी बियाण्याची लिकिंग; शेतकरी संकटात ! अधिकाऱ्यांची शोधमोहीम; कारवाई मात्र गुलदस्त्यात

३. खुशखबर! ४ हजार ६४४ तलाठी पदांची जाहिरात प्रसिद्ध, कोणत्या जिल्ह्यात किती जागा? काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!