Just another WordPress site

खुशखबर! ४ हजार ६४४ तलाठी पदांची जाहिरात प्रसिद्ध, कोणत्या जिल्ह्यात किती जागा? काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Talathi Bharti 2023 Updates : तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने राज्यातील एकूण ४ हजार ६४४ तलाठी (गट क) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये तलाठी पदाची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. (4 thousand 644 talathi posts advertisement released, how many seats in which district? What is the last date to apply?)

तलाठी पदाच्या भरतीसाठी उमेदवार येत्या २६ जूनपासून ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज भरण्यासाठी एकूण २२ दिवसांचा अवधी देण्यात आला असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ९०० रुपये आहे. माजी सैनिक उमेदवारांकडून कुठलेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. या पदभरतीसाठी उमेदवार केवळ ऑनलाइन परीक्षा शुल्क भरू शकतात. उमेदवारांनी अर्ज आणि परीक्षा शुल्क भरल्यानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र महसूल विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल.

कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

औरंगाबाद-१६१, जालना-११८, परभणी-१०५, हिंगोली-७६, नांदेड-११९, बीड-१८७, लातूर-६३, उस्मानाबाद-११०, नागपूर-१७७, वर्धा-७८, भंडारा-६७, गोंदिया-६०, चंद्रपूर-१६७, गडचिरोली-१५८, अमरावती-५६, अकोला-४१, वाशिम-१९, बुलढाणा-४९, यवतमाळ-१२३, पुणे-३८३, सातारा-१५३, सांगली-९८, सोलापूर-२९७, कोल्हापूर-५६, नाशिक-२६८, धुळे-२०५,
नंदुरबार-५४, जळगाव-२०८, अहमदनगर-२५०, मुंबई शहर-१९, मुंबई उपनगर-४३, ठाणे-६५, पालघर-१४२, रायगड-२४१, रत्नागिरी-१८५, सिंधुदुर्ग-१४३

या पदभरतीला अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवार हा संगणक माहिती तंत्रज्ञान परीक्षा उत्तीर्ण असणंही आवश्यक आहे. यासोबतच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक उमदेवारांना आवश्यक प्रमाणपत्रे पीडीएफ फाईलमध्ये ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेल्या वयोमर्यादेच्या संदर्भात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांचे वय ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे, असे जाहिरातीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

महत्वाचं म्हणजे, तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यातून अर्ज करू शकतात. त्यामुळे विविध जिल्ह्यांतून सादर केलेले अर्ज नाकारले जातील याची कृपया नोंद घ्यावी. या भरतीसाठी महाराष्ट्र सरकार १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत परीक्षा घेणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून तलाठी पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यासंदर्भातील जाहिरात महसूल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!