Just another WordPress site

शेतकऱ्यांनो, पशुधनाचे आरोग्य सांभाळा : वाढत्या तापमानाचा पाळीव जनावरांनाही उष्माघाताचा धोका

अतिउष्ण वातावरणामुळे जनावरांच्या पचनसंस्था, प्रजनन संस्थेवर विपरित परिणाम

वर्धा : उन्हाळ्याच्या झळा जीवाची लाहीलाही करीत आहेत. अशात जिल्ह्यात तापमान चाळिशीपार गेले आहे. तापमानाचा पारा वाढत असून, जनावरांमध्ये (Animal Heatstroke) उष्माघाताचा (heatstroke) धोका निर्माण झाला आहे. अतिउष्ण वातावरणामुळे (Superheated environment) जनावरांवर ताण येऊन त्यांना पचनसंस्था, प्रजनन संस्थेवर विपरित परिणाम होत आहेत. परिणामी, रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन उत्पादकता खालावत आहे. (Pets Are Also At Risk Of Heat Stroke Protection of animals from heatstroke)

Heat stroke : उष्माघाताकडे दुर्लक्ष नको, राज्यात १३ रुग्णांची नोंद 

जिल्ह्यात मार्च महिन्यातच उन्हाचा पारा ४२ पार गेला. एप्रिल आणि मे महिन्यांत आतापर्यंत पारा ४८ डिग्री सेल्सिअसवर गेल्याचा इतिहास आहे. मार्च महिन्यात पाऱ्याने ४० अंश ओलांडल्याने एप्रिल-मे महिन्यांत आणखी तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. अशात जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. जनावराला दिवसभर मुबलक व स्वच्छ पाणी असावे. गोठ्याची उंची जास्त असावी, जेणेकरून नैसर्गिक हवा मोकळेपणाने मिळते. गोठा थंड राहण्यास मदत होते. छपराचा गोठा असल्यास त्यावर पालापाचोळा किंवा ताडपत्री टाकावी जेणेकरून तापमान वाढणार नाही.

काय करावे?
■ पशूंना उन्हामध्ये बांधू नका. पशूंना शक्यतो थंड, स्वच्छ, मुबलक पाणी दोन-तीन वेळेस पाजावे.
■ जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत,५ लिटर पाण्यामध्ये चिमूठभर गूळ, थोडे मीठ आणि ५ ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.

उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना
■ जनावरांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चारण्यासाठी सोडू नये.
■ खाद्यामध्ये वाळलेला चायाचा जास्तीचा उपयोग करू नये. हिरव्या चाऱ्याचा वापर करावा.
■ गोठ्यामध्ये जास्त जनावरांना बांधू नये. जेणेकरून गर्दी होऊन श्वास घेणे अवघड होते.
■ उष्माघात झालेल्या जनावरांवर पशुतज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

उष्माघाताची लक्षणे
जनावरांचे डोळे लाल होणे, भूक मंदावते, नाकपुडी कोरडी होणे, शरीराचे तापमान वाढणे, नाकातून रक्त येणे, श्वास जोरात घेणे, धापा टाकणे, चक्कर आल्यासारखी वाटते. अतिउष्ण दमट किंवा उष्ण कोरड्या हवामानात, घाम गाळून आणि धापा टाकून उष्णता नष्ट करण्याची जनावरांची पार थमरेग्युलेटरी क्षमता धोक्यात येते आणि उष्णतेचा ताण निर्माण होतो. तीव्र उष्णतेच्या ताणामुळे शरीराचे तापमान वाढते, नाडीचा वेग वाढतो, परिधीय रक्त प्रवाह वाढतो, खाद्याचे सेवन कमी होते आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढते.

निवडणूक लागली, घरातले पिस्तूल पोलिसांत जमा केले का? 

पाळीव प्राण्यांमधील उष्माघात टाळा
१. जनावरांच्या चायामध्ये जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचा (मका) वापर करावा. जेणेकरून त्यांची पचनक्रिया व्यवस्थित राहते. पोटाचे आजार होणार नाहीत. पोटाचे आजार होणार नाहीत.
२. माजावर आलेल्या जनावरांचे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा रेतन करावे. या जनावरांची योग्य काळजी घ्यावी.
३. दुभत्या जनावरांमध्ये योग्य पशुआहार, हिरवा चारा, मुरघासाचा वापर, खनिज मिश्रण व वेळोवेळी जंतनाशक औषधांचा वापर केल्यास संकरित जनावरे आजारी पडत नाहीत.

जनावरांत उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व पशुचिकित्सा रुग्णालयाला सूचना करण्यात आल्या आहे. तरी पशुपालकांनी धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यास पशुचिकित्सालयात जनावरांची तपासणी करून घ्यावी.
– सूरज गोहाड,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!