Just another WordPress site

रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळणार, खासगी लष्कराने केली पुतीन यांच्याविरोधात बंडखोरी

मॉस्कोः रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांनीच निर्माण केलेल्या वॅग्नर या सत्ताबाह्य खासगी लष्कराने बंडखोरी केली आहे. या लष्करी संघटनेचा वापर देशाबाहेरच्या दहशतवादी कारवायांसाठी केला जायचा. विशेष म्हणजे या वॅग्नर लष्कराचा (Wagner Army) युक्रेन युद्धामध्येही वापर झाला. मात्र, हे युद्ध लांबले आणि त्यात वॅग्नरचे मोठे नुकसान झाले. यानंतर आता या खासगी लष्कराने पुतीन यांच्याविरोधात बंडखोरी केली. तसेच पुतीन यांनी चुकीचा मार्ग अवलंबला, आता लवकरच रशियाला एक नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल, असे सूचक वक्तव्य केले आहे. (Russia will have a new president, the private army has rebelled against Putin)

वॅग्नरची ही घोषणा राष्ट्रपती पुतीन यांच्यासाठी थेट आव्हान मानले जात आहे. या बंडखोरीनंतर राष्ट्रपतींचे निवासस्थान क्रेमलिन अलर्ट मोडवर आले असून संपूर्ण मॉस्को शहर अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अनेक महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वॅग्नरचे बंड आणि घोषणेनंतर रशियासाठी पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

पुतीन यांनी बंडखोर खासगी लष्कराला संपवण्याची शपथ घेतल्यानंतर आता वॅग्नर लष्कराचा प्रमुख येवगिनी ग्रिगोझीनने पुतीन यांनी चुकीचा मार्ग अवलंबल्याचे म्हटले आहे. तसेच लवकरच रशियाच्या जनतेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळतील, असे सुतोवाच केले. वॅग्नर लष्कराने रशियाच्या दोन शहरांवर आपले नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. याशिवाय वॅग्नरने रशियन सैन्याचे तीन हेलिकॉप्टर पाडल्याचाही दावा केला आहे.

बंडखोरांचा रोस्तोव शहरावर ताबा
रशियाचे खासगी सैन्य वॅग्नर आर्मीने सरकारविरोधात मोर्चा उघडताना रोस्तोव शहरावर कब्जा केला आहे.

रशियात नेमके काय घडतेय?
• युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या पीछेहाटीवरही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात आले होते. या कलहाचं रुपांतर अखेर शनिवारी वॅग्नरच्या बंडामध्ये झालं.
• बंडखोरीनंतर राष्ट्रपतींचे निवासस्थान क्रेमलिन अलर्ट मोडवर आले असून संपूर्ण मॉस्को शहर अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अनेक महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वॅग्नरचे बंड आणि घोषणेनंतर रशियासाठी पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

दहशतवादी मार्गाने सशस्त्र बंड
दरम्यान, वॅग्नर लष्कराच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी वॅग्नर लष्करावर देशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, रशियात जे घडत आहे ती गद्दारी आहे. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेमुळे देशद्रोह करण्यात आला आहे, असाही आरोप पुतीन यांनी केला आहे. ज्यांनी जाणीवपूर्वक दहशतवादी मार्गाने सशस्त्र बंड केला आहे, त्यांना कठोर शिक्षा होईल. दरम्यान, युक्रेन युद्धात वॅग्नर खासगी लष्कराचे मोठे नुकसान झाले. त्याची जबाबदारी घेणे पुतीन यांनी टाळले आणि म्हणून ही बडखोरी झाली. आता त्याचे रशियावर दूरगामी परिणाम होतील असे जाणकार सांगत आहेत.

नवा राष्ट्रपती मिळेल?
वॅग्नर ग्रुपने त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून ही घोषणा केली आहे. पुतीन यांनी चुकीचा पर्याय निवडला असून रशियाला लवकरच नवा राष्ट्रपती मिळेल अशी घोषणा वॅग्नरने केली आहे.

गृहयुद्धाची घोषणा
यात आपलाच विजय होईल असेही वॅग्नरने म्हटले आहे. एक किंवा दोन गद्दारांच्या जीवाला २५००० सैनिकांच्या जीवापेक्षा जास्त महत्त्व देण्यात आले आहे. रशियात •अधिकृतपणे गृहयुद्ध सुरू झाले आहे, असे वॅग्नरने घोषणेत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!