Just another WordPress site

Hafiz Abdul Salam Bhuttavi : २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा तुरूंगात मृत्यू, संयुक्त राष्ट्राची घोषणा

Hafiz Abdul Salam Bhuttavi Death : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा (Hafiz Saeed) जवळचा सहकारी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी (Hafiz Abdul Salam Bhuttavi) याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात (Mumbai in 26/11 attacks) भुट्टावीची महत्त्वाची भूमिका होती. 29 मे 2023 रोजी पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. दरम्यान, तब्बल सात महिन्यांनंतर या माहितीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राने (United Nations) भुट्टावीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Milk Adulteration : पशुखाद्याचे दर कमी करून दूध भेसळीला अन् मिल्कोमीटर लुटमारीला लगाम लावा; किसान सभेची मागणी 

हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने ही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर 9 महिन्यानंतर बिंग फुटले असून संयुक्त राष्ट्रानेही याला दुजोरा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वेबसाइटवर एक प्रेस रिलीज जारी करण्यात आले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, 77 वर्षीय भुट्टावी यांचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहरातील तुरुंगात मृत्यू झाला. 29 मे 2023 रोजी तुरुंगाच्या कोठडीत भुट्टावीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याला पाकिस्तान सरकारने तुरुंगात टाकले होते, 2008 मध्ये लष्कर-ए-तोयबाने मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यासाठी भुट्टावी र करण्यात मदत केली होती. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते, असे संयुक्त राष्ट्राच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानने हाफिज सईदला अटक केली होती. त्यानंतर भुट्टावीकडून लष्कर-ए-तैयबाच्या दैनंदिन कारवायांचा सईद आढावा घेत होता. संयुक्त राष्ट्रांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हाफिज सईद भुट्टावी हा 2002 पासून लाहोरमधील लष्कर-ए-तोबाचा कारभार पाहात होता.

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; ०१ फेब्रुवारीला होणार बजेट सादर 

हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीवर अमेरिकेने देखील निर्बंधही लादले होते. यानंतर संयुक्त राष्ट्रानेही त्याला दहशतवादी घोषित केले. हाफिजने पंजाबमध्ये लष्कराचे मुख्यालय स्थापन केले होते. त्याला पाकिस्तान सरकारने अटकही केली होती. 2019 पर्यंत, तो पंजाबमधील शेखूपुरा जिल्हा कारागृहात कैद होता. 2020 मध्ये, लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने त्याला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र गेल्या वर्षी मे महिन्यात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!