Just another WordPress site

…आणि झुकेरबर्ग यांनी मागितली माफी; सिनेटच्या न्यायिक कमिटीसमोर झाडाझडती

वॉशिंग्टन – सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे युवापिढीवर विपरीत परिणाम होत असल्याच्या आरोपामुळे मेटा (Meta) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांची आज सिनेटच्या न्यायिक कमिटीपुढे झाडाझडती झाली. अत्यंत नाट्यमय वातावरणात झालेल्या या सुनावणीदरम्यान व्यवसायासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मालकांचे हात रक्ताने रंगले असल्याचे गंभीर आरोप झुकेरबर्ग यांच्यावर करण्यात आले आणि मार्क झुकेरबर्ग यांनी सिनेट सदस्यांची माफी मागितली. सोशल मीडियामुळे ज्या युवकांच्या पालकांना मनस्ताप झाला, त्यांची आपण माफी मागतो, असे झुकेरबर्ग यांनी सिनेट समोर उभे राहून सांगितले.

मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांत मतभेद, बबनराव तायवाडेंची भुजबळांविरोधात भूमिका 

तुम्ही आतापर्यंत जे सोसले त्याबद्दल मी दिलगीर आहे. तुम्हा कुटुंबीयांना जे सहन करावे लागले, ते आता कोणालाही सहन करायला लागता कामा नये, याचसाठी आम्ही एवढी गुंतवणूक केली आहे, असे सांगून सोशल मीडियाच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी मेटाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहितीही झुकेरबर्ग यांनी दिली.

सिनेटच्या कमिटीसमोर झुकेरवर्ग यांच्यासमवेत स्नॅपचे सीईओ इव्हान स्पीगेल, एक्स (पूर्वीचे ट्रिटर) च्या सीईओ लिंडा याकारिनो टिक टॉकचे सीईओ शाऊ चिऊआणि डिस्कॉर्डचे सीईओ जेसन सिट्रोन यांची देखील झाडाझडती घेण्यात आली.

Budget 2024 : आता अंगणवाडी सेविका अन् आशा वर्कर्सनाही मिळणार ‘आयुषमान भारत’ योजनेचा लाभ; बजेटमध्ये मोठी घोषणा 

या सोशल मीडिया प्लॅटफॉम्र्समुळे युवकांवर काय विपरीत परिणाम होऊ शकतात, याची तपासणीही सिनेटच्या या न्यायिक कमिटीकडून केली गेली. मात्र सोशल मीडियाचा युवकांवर झालेल्या विपरीत परिणामामुळे ज्या पालकांना मनस्ताप झाला, त्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मिसुरीचे रिपब्लिकन सदस्य सेन जोश हँवले यांनी झुकेरबर्ग यांना उद्देशून या सुनावणीदरम्यान केली. तेंव्हा बातावरण तंग झाले. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक पालकांनी आपल्या मुलांचे फोटो उंचावून या मागणीच्या समर्थनार्थं घोषणाबाजी केली.

एका खासदार महिलेने सोशल मीडियाच्या अब्जाधीश सीईओंचे हात रक्ताने माखले असल्याचा थेट आरोप देखील केला. सोशल मीडीयाच्या अतिवापरामुळे रिपब्लिकन नेत्याच्या मुलाने आत्महत्या केली होती. या नेत्याने मेटाविरोधात खटला दाखल केल्याचा संदर्भही यावेळी देण्यात आला. सोशल मीडियावर अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने खंडणीसारखे गुन्हेही वाढल्याचे यावेळी सांगितले गेले.

अन्य अनेक प्रकरणांचा संदर्भ दिला गेल्यानंतर झुकेरबर्ग यांनी मनस्ताप झालेल्या पालकांची माफी मागितली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!