Just another WordPress site

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; ०१ फेब्रुवारीला होणार बजेट सादर

Parliament Budget Session 2024: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session of Parliament) येत्या ३१ जानेवारी रोजी सुरू होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिवेशन ९ फेब्रुवारीपर्यंत चालेल. १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान किंवा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) सत्तेत येणारे नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.

पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर ठाकरेंच्या हातून AB form का घेतला बरं?, जुना फोटो ट्वीट करत ठाकरे गटाचा खोचक सवाल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. १७ व्या लोकसभेचेही हे शेवटचे अधिवेशन आहे. या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी पूर्ण होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षातील अर्थसंकल्प मांडण्याऐवजी खर्चाची तरतूद असणारा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, महिलांसाठी

Mla Disqualification Verdict : अपात्रता निकाल स्क्रिप्टेड, महाशक्तीच्या आदेशानुसार नार्वेकरांचा निर्णय; वडेट्टीवारांचे टीकास्त्र 

एखाद्या योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशन संपताच निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. मार्च, एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. गत महिन्यात पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसदेतील घुसखोरीच्या मुद्दयावरून मोठा गदारोळ झाला होता. या अधिवेशनात

दोन्ही सभागृहांमधील अर्थसंकल्पीय १४६ खासदार निलंबित करण्यात अधिवेशनात सर्वसाधारण आले होते. एका अधिवेशनात इतक्या विक्रमी संख्येने विरोधी खासदारांना निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ होती. विरोधकांच्या अनुपस्थितीत सरकारने तीन नव्या फौजदारी कायद्यांसह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!