Just another WordPress site

विद्रोही व्यंगकवी संपत सरल करणार १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मुंबई : ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर (Amalner) येथे भरणाऱ्या १८ व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे (Akhil Bhartiy Vidrohi Sahitya Sammelan) उद्घाटन जयपूर (राजस्थान ) येथील सुप्रसिद्ध विद्रोही व्यंगकवी संपत सरल (Sampat Saral) यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी मुंबई प्रेस क्लब येथे बैठकीत दिली.

Hafiz Abdul Salam Bhuttavi : २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा तुरूंगात मृत्यू, संयुक्त राष्ट्राची घोषणा

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक डॉ. लीलाधर पाटील, निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, डी. ए. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून ‘विद्रोही मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे इ. ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने आयोजित केली आहेत.

Milk Adulteration : पशुखाद्याचे दर कमी करून दूध भेसळीला अन् मिल्कोमीटर लुटमारीला लगाम लावा; किसान सभेची मागणी

महाराष्ट्रातील आयु. बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंके, उर्मिलाताई पवार आदी सर्जनशील, प्रगतीशील साहित्यिक नाटककार, कवी आदींनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवत विद्रोही साहित्य संस्कृतीचा आवाज आपल्या अध्यक्षीय मांडणीतून बुलंद केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज, प्रसिद्ध शायर निदा फाजली, डॉ. उमा चक्रवर्ती, मा. सुशिला टाकभौरे, आयु. जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे आदिंनी विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटने करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदवला.

यंदाचे १८ वे विद्रोही साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे भरवले जाणार आहे. त्याचे उद्घाटन करणार असलेले संपत सरल हे नाव जगभर लोकशाही मूल्यांवर निष्ठा असणारा विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी संपूर्ण भारतासह यूएसए, कॅनडा, ओमान, सिंगापूर, हाँगकाँग, यूएई, थायलंड, सौदी अरेबिया आणि नेपाळ आदी विविध देशांत आपले काव्य आणि मुशायरा सादर केले आहेत. समकालीन राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारे विद्रोही व्यंगकवी म्हणून त्यांना ओळखले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!