Just another WordPress site

पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर ठाकरेंच्या हातून AB form का घेतला बरं?, जुना फोटो ट्वीट करत ठाकरे गटाचा खोचक सवाल

Shinde Vs Thackeray : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल (Mla Disqualification Verdict) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने लागला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या शिवसेनेच्या दोन्ही गटांना पात्र ठरवले आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा लोकशाही आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असून घराणेशाही आणि हुकूमशाहीचा पराभव आहे, असं वक्तव्य केलं. दरम्यान, या टीकेला उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं.

Mla Disqualification Verdict : अपात्रता निकाल स्क्रिप्टेड, महाशक्तीच्या आदेशानुसार नार्वेकरांचा निर्णय; वडेट्टीवारांचे टीकास्त्र 

उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जुना फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, मुख्यमंत्री शिंदे यांना २०१९ साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकधिकारशाही वगैरे वगैरे तुम्हाला दिसली नव्हती. हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का? असा खोचक सवाल दानवेंनी केला.

 

 

फोटोत काय आहे?
दानवे यांनी शेअर केलेला फोटो हा एकनाथ शिंदे यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट आहे. हे ट्विट 30 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म घेताना दिसत आहेत. तसेच या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज विधानसभआ निवडणूक २०१९ करिता कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर दर्शवला. मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार, असंही म्हटलं.

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीत बिघाडी होणार? बिहारमध्ये लोकसभेच्या आठ जागांवर ‘डाव्यांचा’ दावा 

ट्विट डिलीट करू नका
शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिपोस्ट करण्यात आलं आहे तसेच त्यासोबत जर पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर त्यांच्या हातून AB form का घेतला बरं? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. आता हे ट्विट डिलीट करू नका! असा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे.

हुकूमशाहीने पक्ष चालवणाऱ्या नेत्यांना झटका – एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा सगळ्यांचा आहे. सत्तेत आल्यापासून कायम एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद जाणार असे सारखे बोलत होते. पण, अजूनही मी सत्तेत आहे. या निर्णयाने हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हा सर्व महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.
शिंदे म्हणाले, विरोधक कोणाला मानत नाहीत. निवडणूक आयोग, न्यायालयालाही मानत नाहीत. ते स्वतःला सर्व संस्थांपेक्षा मोठे समजतात. सर्वोच्च न्यायालयालाही अनेक सल्ले देण्याचं काम त्यांनी केलं म्हणून त्यांना आज चपराक मिळाली. त्यांनी 2019 मध्ये जनतेशी बेईमानी केली असल्याची टीकाही शिंदेंनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!