Just another WordPress site

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीत बिघाडी होणार? बिहारमध्ये लोकसभेच्या आठ जागांवर ‘डाव्यांचा’ दावा

Loksabha Election 2024 : केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना केली आहे. या आघाडीतील घटक पक्षांनी19 डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही तारीख निश्चित केली होती. मात्र ही मुदत उलटून नवीन वर्ष 2024 सुरू झालं. तरीही इंडिया आघाडीचं जागावाटप झालं नाही. बहुतांश राज्यात प्रादेशिक पक्ष अतिरिक्त जागा मिळाव्यात यासाठी अडून बसले आहेत. त्यामुळं ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शिवाय, डाव्या पक्षांकडून अडथळे येत आहेत. (Loksabha Election 2024)

Asha Workers Strike : आशा आणि गटप्रवर्तक पुन्हा संपावर, १२ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा 

डाव्यांना पुरेशा जागा न मिळाल्यास भारतीय कम्युनिस्ट पार्टी (Communist Party of India मार्क्सवादी-लेनिनवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) संयुक्तपणे स्वतंत्र उमेदवार उभे करतील, असा इशारा या पक्षांनी दिला आहे. सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा (D. Raja) यांनी मंगळवारी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत.

2019 च्या निवडणुकीत भाजप आणि संयुक्त जनता दल (JDU) यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. यामध्ये भाजपने १७ तर जेडीयूने १६ जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. तर राष्ट्रीय जनता दलाला खातेही उघडता आले नव्हते.

दरम्यान, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘जेडीयू’ आणि लालू प्रसाद यांचा ‘आरजेडी’ पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांचे पक्ष १६-१६ जागा लढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उर्वरित आठ जागा काँग्रेस आणि डाव्यांमध्ये विभागल्या जातील. मात्र काँग्रेसने आठ ते दहा जागांवर दावा केल्याने तिढा निर्माण झाला आहे. यात सुवर्णमध्य काढण्यासाठी नितीशकुमार आणि लालू प्रसाद हे पुढाकार घेत असून पाच जागा कॉंग्रेसला तर तीन जागावर डाव्या पक्षांचे उमेदवार उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, डाव्यांनी पाच ते आठ जागांची मागणी केली आहे. त्यामुळं काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागेल.

केजरीवालांनी दिला १६ जागांचा प्रस्तव
दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. काँग्रेस नेतृत्व आणि अरविंद केजरीवाल एकत्र दिसत असले तरी, दोन्ही पक्षांतील राज्यपातळीवरील नेते एकमेकांविरोधात वक्तव्ये करत आहेत. शिवाय, आम आदमी पक्षाने पाच राज्यांतील १६ लोकसभा जागांवर दावा केला आहे. यामध्ये गोवा आणि गुजरातचाही समावेश आहे. सोमवारी काँग्रेस आणि आप नेत्यांमध्ये बैठक झाली. यावेळी ‘आप’ने काँग्रेसपुढे पाच राज्यांतील जागांवर दावा केला आहे.

पंजाब आणि दिल्ली व्यतिरिक्त हरियाणा, गोवा आणि गुजरातमध्ये आप लोकसभेच्या जागांची मागणी करत आहे. यापैकी दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. ‘आप’ने पंजाबमध्ये सात जागा, दिल्लीत चार, हरियाणामध्ये तीन आणि गोवा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एका जागेवर दावा केला आहे.

Disability fund : वेगळे मंत्रालय दिले, पण दिव्यांग आर्थिकदृष्ट्या विकलांगच! पाच महिन्यांपासून निधी रखडला 

यापैकी फक्त पंजाबमध्ये आपचा एक खासदारआहे. इतर राज्यात आपचा एकही खासदार नाही. पंजाबमध्ये काँग्रेसचे आठ खासदार आहेत. आपच्या या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली. ‘आप’चा हा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सादर केला जाणार आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतरच पुढील बैठकीत आपच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!