Just another WordPress site

दिलजमाई! सत्तांतरानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार? दिवसही ठरला!

मुंबई : ज्या क्षणाची अनेक शिवसैनिक डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ येत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत अन् त्यासाठी दिवसही ठरला आहे. केवळ ठिकाण आणि वेळ ठरणं बाकी असून तिही लवकरच ठरण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी, माजी नगरसेवक सगळ्यांमध्ये फूट पडली, इतकंच नाही तर भावा बहिणींमध्ये फूट पडल्याचं दिसून आलं. असं सगळं असताना अनेकांना वाटत होतं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत. काहींना तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत असंच वाटलं होतं. मात्र या चर्चा आता चर्चाच राहू शकतात, कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकाच मंचावर तुम्हाला पाहायला मिळू शकतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

यासाठी दिवस आहे २३ जानेवारी २०२३ चा. या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. याची घोषणा काही दिवसांपूर्वी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

याचनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र, एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून सध्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. तसंच उद्धव ठाकरे यांना अद्याप निमंत्रण दिलेलं नसलं तरी प्रशासनाकडून ते देण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण आता उद्धव ठाकरे स्विकारणार का, निमंत्रण स्विकारलं तर ते या कार्यक्रमाला शिंदेंसोबत हजर राहणार का, हे पाहणं गरजेचं असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!