Just another WordPress site

रेल्वे स्थानकावर १५ रुपयांची पाण्याची बॉटल २० रुपयांना; तक्रार कोठे कराल?

नागपूर : उन्हाळा सुरू झाला आहे. रेल्वेगाड्यांमधील गर्दी वाढलेली आहे. अर्थात रेल्वे स्थानकावर (Railway Station)प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. गर्दीच्या वेळी आणि खासकरून उन्हाळ्यात एकदा काही खायला मिळाले नाही तरी चालेल. मात्र, पाणी वारंवार प्यायला हवे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दीतील अनेक जण थंडगार पाण्याची बाटली (Water Bottle)विकत घेण्यासाठी रेल्वे स्थानकावरील स्टॉलकडे धाव घेतात. रेल्वे प्रशासनाकडून स्थानकावरील स्टॉलधारकाला त्याच्या कमिशनच्या रकमेचा समावेश करून कोणता पदार्थ, कोणते ज्यूस अथवा पाण्याची बाटली किती रुपयांत विकावी, ते ठरवून देण्यात आलेले असते. उदाहरणार्थ पाण्याची बाटली १५ रुपयांतच विकावी, असे त्याला आदेश दिलेले असतात. मात्र, गर्दीचा लाभ उठवत काही स्टॉलधारक १५ ऐवजी १७ ते २० रुपये घेतात. प्रत्येक स्टॉलधारकाची जास्त रक्कम उकळण्याची स्टाईल वेगवेगळी आहे. (Water Sale Of Private Water Bottle Companies In Railway Station)

शेतकऱ्यांनो, पशुधनाचे आरोग्य सांभाळा : वाढत्या तापमानाचा पाळीव जनावरांनाही उष्माघाताचा धोका 

मग १५ रुपये सुटे द्या
पाण्याची बाटली घेताना अनेक जण शंभर, दोनशे, पाचशेची नोट स्टॉलधारकाच्या हाती ठेवतो. अशा वेळी १५ रुपयांऐवजी जास्त रुपये घेऊ पाहणाया स्टॉलधारकाला टोकले तर एक जण म्हणतो, ही घ्या तुमची नोट आणि द्या १५ रुपये सुटे !

मग आमचे काय ?
दुसरा स्टॉलधारक जास्त पैसे मिळत नसेल तर आम्ही काय कमवायचे, असा सवाल करतो.

दोन, चार रुपये आम्हालाही मिळावे ना साहेब !
तिसऱ्याचे उत्तर वेगळेच असते. दिवसभर आम्ही राबतो. दोन, चार रुपये आम्हाला नको का मिळायला, असा त्याचा प्रश्न असतो.

तक्रार कोठे कराल?
स्टॉलधारक खाण्यापिण्याच्या कोणत्याही पदार्थाचे जास्त पैसे मागत असेल तर त्याची तक्रार लगेच स्टेशन मास्तरकडे करायला हवी.

रेल्वे अधिकारी म्हणतात…..
प्रत्येक स्टॉलधारकाला खाण्यापिण्याच्या प्रत्येक पदार्थाचे, पाण्याच्या बाटलीचे दर ठरवून दिलेले असतात. त्यात त्याच्या कमिशनचाही सहभाग असतो. त्यामुळे कोणताच स्टॉलधारक ग्राहकाकडून जास्त रक्कम घेऊ शकत नाही. तसे कुणी करत असेल तर स्टेशन मास्तरकडे त्या स्टॉलधारकाची तक्रार करावी. संबंधितावर कडक कारवाईचे प्रावधान आहे. मात्र, अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे तूर्त आली नसल्याचेही रेल्वे अधिकारी म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!