Just another WordPress site

प्राजक्त तनपुरे, अर्जुन खोतकरांना दिलासा, राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार (State Cooperative Bank) प्रकरणात जालना सहकारी साखर कारखाना (Jalna Cooperative Sugar Factory) आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना (Ram Ganesh Gadkari Sugar Factory) गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिंदे गट शिवसेना माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि जुगलकिशोर तापडिया व समीर मुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure), प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दिलासा दिला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या सर्वांना वैयक्तिक २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या सर्वांना समन्स बजावून न्यायालयात हजर रहाण्याचे निर्देश देण्यात आले होते.

विद्रोही व्यंगकवी संपत सरल करणार १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन 

राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात ईडीने याआधी पवार दाम्पत्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याबरोबरच जालना सहकारी साखर कारखाना आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ईडीने या दोन्ही साखर कारखान्यांमध्ये अनावश्यक आर्थिक व्यवहार झाल्याचा ठपका ठेवून मनिलॉण्डरिंग केल्याचा आरोप केला. याची विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली. ईडीच्या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे मत व्यक्त करत माजी आमदार अर्जुन खोतकर आणि जुगलकिशोर तापडिया यांच्यासह राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्रीप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांना समन्स बजावत न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश दिले होते.

Hafiz Abdul Salam Bhuttavi : २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा तुरूंगात मृत्यू, संयुक्त राष्ट्राची घोषणा 

त्यानुसार सर्वांनी न्यायाधीश रोकडे यांच्या न्यायालयात हजेरी लावली. या वेळी रणजीत देशमुखांसह सर्वांनी जामिनासाठी अर्ज केला. रणजीत देशमुख आजारी असल्याने त्यांना वैद्यकीय कारणास्तव तातडीने जामीन मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली. या वेळी ईडीने या सर्वांचा जबाब नोंदवलेला असल्याने जामीन अर्जाला विरोध केला नाही. याची दखल घेत न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

१९८४ मध्ये उभारण्यात आला. तत्कालीन राज्य सरकारने, या साखर कारखान्यासाठी, तब्बल १०० एकर जमीन विनामूल्य दिली. ९ हजार भागधारक शेतकरी असलेला हा कारखाना तोट्यात गेल्याने महाराष्ट्र राज्य स्टेट को ऑप बँकेकडून कर्ज घेण्यात आले. या कर्जाची परतफेड करता येईना, म्हणून पुन्हा कर्ज घेण्यात आले. कर्ज फेडण्यासाठी जालना सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. अवघ्या ४२ कोटी ३१ लाख रुपयांना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीजने तो खरेदी केला.

राम गणेश गडकरी साखर कारखाना तोट्यात गेल्याने २६ कोटी ३२ लाखांची मागणी असलेला कारखाना १२ कोटी ८५ लाखांत या नाममात्र दरात विकला. त्यात सुमारे १३ कोटी ३७ लाखांचा मनिलॉण्ड्ररिंगचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!