Just another WordPress site

कॉ. पानसरे स्मारकाचे आज लोकार्पण, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार डी. राजा यांची उपस्थिती

कोल्हापूर : प्रतिनिधी कॉ. गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या ९ व्या शहीददिनाचे औचित्य साधून मंगळवार दि. २० रोजी सायंकाळी ५ वाजता कॉ. गोविंद पानसरे स्मारकाचा (Govind Pansare Memorial) लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील प्रतिभानगरातील रेड्याच्या टक्करी जवळील वि. स. खांडेकर प्रशाला मैदानावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पुरोगामी नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळयास खासदार डी. राजा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

नगरकरांसाठी दर्जेदार चित्रपटांची मेजवानी, आजपासून न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये ‘प्रतिबिंब’ चित्रपट महोत्सव 

सोहळयाच्या पार्श्वभुमिवर आमदार सतेज पाटील यांनी रविवार स्मारकस्थळी भेट देवून या परिसराची पहाणी केली. झेड प्लस सुरक्षा असल्याने व व्हीआयपी येणार असल्याने कोणतीही कुचराई राहू नये, यासाठी स्वतः लक्ष घालून त्यांनी पहाणी करून दक्षता घेतली आहे. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमास पानसरे यांच्या कन्या कॉम्रेड स्मिता पानसरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भालचंद्र कानगो यांच्यासह आमदार सतेज पाटील, सुभाष लांडे-पाटील, आ. पी. एन. पाटील, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, आ. ऋतुराज पाटील व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजय देवणे हे उपस्थित राहाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!