Just another WordPress site

नगरमध्ये माफियाराज, गुंडांना फडणवीसांनीच पोसलं, तर पोलीस हे आमदारांचे हस्तक; निर्भय बनो सभेत वागळेंचा हल्लाबोल

अहमदनगर : नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो (Nirbhay Bano) आंदोलनाच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकशाही टिकविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सरकारला न घाबरता निर्भय बनायला हवे, असे आवाहन सभेत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि पोलीस (Ahmednagar Police) यांच्यावर जोरदार टीका केली. नगरला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा ‎‎वारसा आहे. मात्र, आज या शहरात ‎‎’माफियाराज’ ची चर्चा होतेय. नगरमध्ये ‎‎पोलिस आणि माफियाराज यांचे ‎‎संगनमत आहे. ‎ मी नगरमध्ये येताच पोलिस मला‎ नोटीस देऊन आमदार संग्रामभैय्या ‎‎जगताप यांच्याबाबत बदनामीकारक ‎‎बोलू नका, असे सांगतात. कारण, ते जगताप यांचे हस्तक आहेत, अशी टीका वागळेंनी केली. (Ahmednagar News)

शिक्षकांनो, निवडणूक कामांवर बहिष्कार टाका; राज्य शिक्षक सेनेचे आवाहन 

माउली सभागृहात मंगळवारी सायंकाळी लोकशाही विचार मंचच्या वतीने ही सभा घेण्यात आली. माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पत्रकार निखिल वागळे यांनी सभेला मार्गदर्शन केले. माउली सभागृहात झालेल्या या सभेसाठी महाविकास आघाडीचे नेते व नागरिक मोठ्या संख्येचे उपस्थित होते. सभेत बोलताना वागळे यांनी देशात हुकूमशाही आल्यासारखे वातावरण असून, नागरिकांनी याचा मुकाबला करणे आवश्यक आहे, असे सांगितले. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकांनी मौन सोडून स्पष्टपणे बोलायला हवे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी राजस्थान, गुजरातमधून कापड खरेदीचा डाव, सरकारने काढले १३८ कोटींचं टेंडर 

‘निर्भय बनो’ या सभेपूर्वी पोलिसांनी वागळे यांना एक पत्र दिले होते. या पत्रात ‘आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करु नका’ असा मजकूर पोलिसांनी लिहिलेला आहे. त्यावरून वागळेंनी संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नगरला येईपर्यंत मला पंडित नेहरु, आचार्य नरेंद्र देव माहित होते. आज पोलिसांनी एका माणसाची ओळख मला करुन दिली त्याचं नावही मला माहित नव्हतं. त्याचं नाव आमदार संग्राम भैय्या जगताप. पोलिसांनी पत्रात लिहिलंयं, पोलिसांनी पत्रात संग्रामभैय्या जगताप म्हटलं आहे. त्यांनी संग्राम जगताप म्हटलं पाहिजे. हे पोलिसांचे भैय्या आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी खोटी बदनामीकारक भाषा करुन नये, तुमच्या विधानामुळे तेढ निर्माण झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. संग्राम जगतापांवर बोलू नये असं पोलिस सांगत सांगत आहेत. तो छोटा माणूस आहे, गावगुंडांबद्दल मी फारसं जास्त काही बोलत नाही. मी राष्ट्रीय पातळीवरच्या गुंडांवर बोलतो, असंही निखिल वागळे म्हणाले आहेत.

पोलीस संग्राम जगताप यांचे हस्तक
अहमदनगरमध्ये येताच पोलिसांनी मला जगताप यांच्याविरोधात बदनामीकारक बोलू नका,अशी नोटीस मला देण्यात आली आहे. पण तेलंगणाचा आमदार टी राजासिंग महाराष्ट्रात येऊन प्रक्षोभक भाषण करतो. त्याच्यासोबत नारायण राणेंचा एक मुलगा असतो. पोलिसांना एकच सांगतो टी राजासिंग, राणेला, देवेंद्र फडणवीसांना कधी नोटीसा का देत नाहीत? असा रोखठोक सवाल वागळेंनी पोलिसांना केला आहे. टी राजासिंग, देवेंद्र फडणवीस, राणे यांच्यासह इतर नेते भाषणे करत असतात. त्यांना कधीही नोटीसा दिलेल्या नाहीत. तर मग 45 वर्षे पत्रकार असणाऱ्या निखिल वागळेला तुम्ही नोटीस देता. मला नोटीस बजावली, कारण पोलीस सत्ताधाऱ्यांचे गुलाम, संग्राम जगताप यांचे हस्तक आहात, असा घणाघातही वागळेंनी केली.

गुंडांना फडणवीसांनीच पोसलं
वागळे म्हणाले, अहमदनगरमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हे घडले आहेत. नगरमध्ये वकिलांची हत्या, खुनी हल्ले, जीवे मारण्याचे प्रयत्न केले जात आहे. अशा माफियांना आणि गुंडांना देवेंद्र फडणवीस यांनीच पोसलं असल्याचा घणाघात वागळेंनी केला आहे.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष निमसे म्हणाले, ‘विरोधी पक्ष आज निर्भय राहिलेले नाहीत. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्था सक्षमपणे काम करताना दिसत नाहीत. अनेक संस्था दबावाखाली आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जनतेने पाठिंबा द्यायला हवा. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीसाठी एवढा लढा द्यावा लागतो याबाबत विचार करण्याची गरज आहे. प्रारंभी सभेचे आयोजक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रास्ताविक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!