Just another WordPress site

‘या’ स्पर्धेतील विजेत्यांना स्वखर्चाने अयोध्येला विमानाने घेऊन जाणार सुजय विखे, स्पर्धेची देशभर चर्चा

अहमदनगर : अयोध्येत (Ram temple in Ayodhya) २२ जानेवारी प्रभू श्रीराम (Lord Shri Ram) यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने नगर शहरात आम्ही ‘मेरे घर आए राम’ (Mere Ghar Aye Ram) ही स्पर्धा जाहीर केली आहे. यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप क्रमांक देणार आहोत. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपण आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून पाठवायची आहे. या सर्वांचे अवलोकन करणार आहोत. यातील प्रत्येक प्रभागातून तीन क्रमांक काढणार आहोत. स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी दोन सदस्यांना विखे कुटुंब स्वखर्चाने विमानाने अयोध्येला (Ayodhya) घेऊन जावून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे, अशी माहिती खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिली.

प्राजक्त तनपुरे, अर्जुन खोतकरांना दिलासा, राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर 

अॅड. जाधव यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी पाठपुरावा केल्याबद्दल २ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ही कामे आता लवकरच मार्गी लागतील, असे त्यांनी नमूद केले. अॅड. जाधव यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा तसेच साखर व डाळ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अँड. धनंजय जाधव, माजी उपमहापौर मालन ढोणे, सचिन पारखी, कालिंदी केसकर, संजय ढोणे, ज्ञानेश्वर काळे, सतीश शिंदे, ऋग्वेद गंधे, पंडित वाघमारे, विनोद बोगा, पियूष जग्गी, श्वेता पंधाड़े झोंड, आदी उपस्थित होते.

विद्रोही व्यंगकवी संपत सरल करणार १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन 

यावेळी अॅड. जाधव म्हणाले की, अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणारा श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ हा पक्ष व जाती धर्म विरहित असून खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होणार आहे, धार्मिकतेबरोबरच विकासाच्या योजना यशस्वी राबवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. विखे पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले आहे, असे ते म्हणाले. यावेळी माजी उपमहापौर मालनताई ढोणे यांचे देखील भाषण झाले.

कॉंग्रेसवर टीका
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून, या कार्यक्रमाचे निमंत्रण कॉंग्रेसने नाकारले आहे. कॉंग्रेसच्या या कृतीवर भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांनी तिखट शब्दांचा मारा केला आहे. ‘ते लोक म्हणत आहे, त्यांना निमंत्रणच आलंच नाही. ही वास्तविकता आहे. ज्यांना निमंत्रण आलेच नाही, तेच म्हणत आहेत मी जाणार नाही, मी जाणार नाही’, अशा शब्दात खासदार विखेंनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!