Just another WordPress site

Manohar Joshi Passed Away: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, वयाच्या 86 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manohar Joshi Passed Away: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे शुक्रवारी 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 वाजता हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 86 वर्षांचे होते. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खास विश्वासू होते. जोशी यांना दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले.

नगरमध्ये माफियाराज, गुंडांना फडणवीसांनीच पोसलं, तर पोलीस हे आमदारांचे हस्तक; निर्भय बनो सभेत वागळेंचा हल्लाबोल

मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती. महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत माटुंगा पश्चिम येथील रुपारेल कॉलेजजवळील W54 या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या जोशी यांनी लोकसभा अध्यक्षपदाची धुराही मोठ्या कुशलतेने सांभाळली. होतीय जोशी यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मे 2023 मध्ये त्यांनी चिकाटीने एका मोठ्या आजारावर मात केली.

 

मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द
मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे.

मनोहर जोशी हे मूळचे बीड येथील होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला.

शिक्षणासाठी ते मुंबईत स्थलांतरित झाले.

मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली.

बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं.

1995 मध्ये युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले.

गेल्या काही वर्षापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.

उद्धव ठाकरे यांचा आजचा जनसंवाद दौरा रद्द होण्याची शक्यता
शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या बुलढाणा आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत. मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.
शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही मनोहर जोशींना आदरांजली वाहिली. ‘ शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणून जगलेले, मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!’ अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!