Just another WordPress site

शिक्षकांनो, निवडणूक कामांवर बहिष्कार टाका; राज्य शिक्षक सेनेचे आवाहन

मुंबई : कारवाईची धमकी देऊन लादण्यात आलेल्या निवडणूकपूर्व कामांवर (pre-election work) शिक्षकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन राज्य शिक्षक सेनेने (Rajya Shikshak Sena) केले आहे. निवडणूकपूर्व कामाकरिता शिक्षकांच्या घेण्यात येणाऱ्या सेवा नियमबाह्य आहेत. राज्य शिक्षक सेनेने यापूर्वीच शिक्षकांना शिकविण्याचे काम करू द्यावे, निवडणूकपूर्व कामे करण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती त्यांच्यावर करू नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र तरीदेखील शिक्षकांना कारवाईची भीती दाखवत निवडणूक कार्यालयात (Electoral Office) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी राजस्थान, गुजरातमधून कापड खरेदीचा डाव, सरकारने काढले १३८ कोटींचं टेंडर 

आरटीई अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार शिक्षकांच्या सेवा निवडणूकपूर्व कामाकरिता घेणे नियमबाह्य असल्याचे शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी आणि मुंबई महापालिका आयुक्त यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार न करता चालवलेली बळजबरी अन्यायकारक असल्याचा आरोप अभ्यंकर यांनी चेंबूर येथे शिक्षक सेना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला.

शेलार-ठाकरे भेटीमुळे नवे राजकीय संकेत; महायुतीला मनसे आपले इंजिन जोडणार! 

शिक्षकांनी यापुढे आपले विद्यादानाचे कर्तव्य चोख पार पाडावे. आरटीई कायद्यात विसंगत आदेशाचे पालन करू नये, अर्थात बेकायदेशीरपणे लादण्यात आलेल्या निवडणूकपूर्व कामांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहनही अभ्यंकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना आरटीई कायद्याची माहिती आहे. शिक्षकांच्या सेवा निवडणूकपूर्व कामासाठी घेतल्यास शाळा बंद होतील अथवा निम्म्या शिक्षकांच्या मदतीने शाळा चालविणे कठीण होईल याची जाणीव त्यांना आहे. तरीदेखील शिक्षकांना अशैक्षणिक कामात जुंपण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीचा विचार न करता शिक्षकांवर अशैक्षणिक कामांची सुरू असलेली बळजबरी अन्यायकारक असल्याचा आरोप शिक्षक सेनेने केला आहे.

बोर्डाच्या परीक्षांसाठी शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा
मुंबई : २१ फेब्रुवारीपासून बारावीची, तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे बीएलओ आणि तत्सम निवडणूक कामांसाठी घेतलेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करा, अशी मागणी करण्यात आला आहे.

अनेक वर्गावरील शिक्षक तसेच अतिरिक्त शिक्षक निवडणूक कार्यालयात कार्यरत आहेत. परीक्षा व परीक्षेसंबधी अनेक कामे पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची आवश्यकता आहे. काही शिक्षकांची भरारी पथकासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच काही शिक्षकांची कस्टडीसाठी व रनरसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षा कालावधीत शाळांमध्ये शिक्षकांची संख्या फारच कमी असते. दर २५ परीक्षार्थीमागे १ पर्यवेक्षक आवश्यक असल्याने आवश्यक तेवढे शिक्षक शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे परीक्षाकाळात शिक्षकांवर कामाचा ताण पडतो. तसेच प्रश्नपत्रिकांची ने-आण करणे, उत्तरपत्रिकांची तपासणी करणे यासारखी कामे शिक्षकांना करावी लागतात. यादरम्यान पाचवी ते नववीपर्यंतच्या वर्गांचीही शाळा सुरूच असते.

दहावीची परीक्षा संपेपर्यंत बीएलओ कामातून शिक्षकांची सुटका करा, अशी मागणी शिक्षक परिषदेचे सहकार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुंबई शहर व उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!