Just another WordPress site

नगरमध्ये कॉंग्रेसला मोठं खिंडार, जिल्हाध्यक्ष नागवडे राष्ट्रवादीत जाणार, जिल्हाध्यक्ष पदाचे दिले राजीनामे

श्रीगोंदा – उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाण्याचा निर्णय घेतला असून येत्या पंधरा दिवसांत प्रवेश करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी कार्यकत्यांच्या बैठकीत केली. दरम्यान, राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) दोघांनीही जिल्हाध्यक्षपदांचे राजीनामे पक्षाकडे पाठवित सोडचिठ्ठी दिली आहे. (Ahmednagar News)

सत्ताधाऱ्यांचं पोट भरेना, स्वच्छतेच्या नावाखाली १७६ कोटींचा चुराडा ! वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा 

श्रीगोंद्यात आयोजित बैठकीत बोलताना राजेंद्र नागवडे म्हणाले, नागवडे कुटुंबाने दोनवेळा दुसऱ्यांना आमदार केले. आजही सामान्य माणूस नागवडे कुटुंबासोबत आहे. उमेदवारी मिळो अगर न मिळो कोणत्याही परिस्थितीत अनुराधा नागवडेंना विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब नाहाटा यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यात नागवडे कुटुंबाला सर्वोतोपरी पाठबळ देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला आहे. त्यामुळे आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पंधरा दिवसांत अजित पवार व नेतेमंडळींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत.

ईव्हीएम बाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा 

नागवडे पुढे म्हणाले, येत्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचा शब्द अजित पवारांनी दिला आहे. महायुती सरकारच्या पाठबळावर श्रीगोंदेकरांना अभिमान वाटेल, अस काम करायचं आहे.

नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले, नागवडे कुटुंबाने अनेकांना मोठे केले. आता कोणत्याही परिस्थितीत नागवडे कुटुंब स्वतः विधानसभा निवडणूक लढणार आहे. कार्यकत्यांनी त्यांना आमदार करण्यासाठी तयारीला लागावे.

नागवडेच महायुतीच्या उमेदवार : नाहाटा
जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडेंना आमदार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अनुराधा नागवडे ह्याच महायुतीच्या उमेदवार असतील, असा दावा राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी केला.

‘एमआयडीसी’, रस्ता पवारांमुळेच : नागवडे
औद्योगिक वसाहत, कारखाना ते इनामगाव रस्ता आदी कामे मार्गी लावण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी ती कामे मार्गी लावली आहेत, असे सांगत राजेंद्र नागवडे यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे आणि अजित पवारांच्या सूचनेनुसार ही कामे मार्गी लागल्याचा दावा केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!