Just another WordPress site

स्वरसरस्वती प्रभा अत्रेंचं निधन, हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९२ व्या मालवली प्राणज्योत, संगीत विश्वावर शोककळा

Prabha Atre Passed Away : संगीत क्षेत्राशी संबंधित एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre ) यांचे दुःखद निधन झाले. किराणा घराण्यातील त्या भारतीय शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळाले आहेत. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे आज पुण्यात निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेऊन जात असतांना वाटेतच हृदयविकाराच्या (Heart disease) झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

‘या’ स्पर्धेतील विजेत्यांना स्वखर्चाने अयोध्येला विमानाने घेऊन जाणार सुजय विखे, स्पर्धेची देशभर चर्चा 

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. पुण्यातील एका शाळेत त्यांचे वडील दत्तात्रय पिलाजी मुख्याध्यापक होते. तर आई इंदिरा या शिक्षिका होत्या. त्याच शाळेत प्रभा यांनी शिक्षण घेतलं. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वयाच्या ८ व्या वर्षी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. आणि इथून त्यांचा संगीतयम प्रवास सुरू झाला. प्रभा यांनी गुरुशिष्य परंपरेत संगीताचे धडे घेतले. किराणा घराण्यातील सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. गायनासोबतच त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षणही घेतले होते.

संगीत शिकत असतानाच अत्रे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केली. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केले. प्रभा यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळ, याशिवाय ट्रिनिटी लबन कंझर्व्हेटरी ऑफ म्युझिक अँड डान्स, लंडन (वेस्टर्न म्युझिक थिअरी ग्रेड-IV) या संस्थामधूनही शिक्षण घेतले होते. पुढे त्यांनी संगीतात पीएचडीही केली.

प्रभा यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. प्रभा यांच्या निधनाने संगीताच्या दुनियेील एक तारा निखळला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!