Just another WordPress site

मोदींनी रोजगार हिरावले, काँग्रेसचा दावा, ‘आयएलओ’ च्या अहवालाचा हवाला देऊन टीका

Mallikarjun Kharge criticizes Prime Minister Narendra Modi : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) लोकांचे लक्ष विचलित करण्याचा, वळवण्याचा प्रयत्न करू -शकतात पण तरुणांमधील बेरोजगारी हा या निवडणुकीतील निर्णायक मुद्दा ठरेल असा ठाम विश्वास काँग्रेसने बुधवारी व्यक्त केला. बेरोजगारीचा मुद्दा हाताळण्यासाठी आपल्याकडे ठोस योजना आहे असा दावाही पक्षाकडून करण्यात आला.

‘कन्नड’ ची मालमत्ता जप्तीवर कर्जत बंद का नाही ?, राम शिंदेंनी घेतला विरोधकांचा समाचार  

‘आंतरराष्ट्रीय श्रम संघटना’ (आयएलओ) आणि ‘मानव विकास संस्था’ (आयएचडी) यांनी जारी केलेल्या भारत रोजगारी अहवाल २०२४चा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांमध्ये २० कोटी रोजगार प्रदान करण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांनी तरुणांकडून १२ कोटींपेक्षा जास्त रोजगार हिरावून घेतले असा आरोप खरगे यांनी केला.

देश बेरोजगारीच्या बाँबवर बसला असून मोदी सरकारच्या अनास्थेचा फटका देशातील तरुणांना बसत आहे, पण मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार “सरकार बेरोजगारीसारख्या सर्व सामाजिक, आर्थिक समस्या सोडवू शकत नाही”, असे म्हणत आपल्या प्रिय नेत्याचा बचाव करत आहेत अशी टीका खरगे यांनी ‘एक्स’ वर केली.

बेरोजगार भारतीयांमधील ८३ टक्के तरुण आहेत आणि ग्रामीण भागांमधीस केवळ १७.३ टक्के तरुणांकडे नियमित काम आहे, तसेच आर्थिक घडामोडींमध्ये तरुणांचा सहभाग कमी झाल्याचे ‘आयएलओ’च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!