Just another WordPress site

‘मिशन बारामती’ यशस्वी होऊन भाजप बारामतीत कमळ फुलवेल का?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून देशभर मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातील पाच मतदार संघातून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येणार असून त्यासाठी पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे बारामतीत कमळ फुलणार का? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु
२. पवारांच्या बारामती मतदारसंघात भाजपने रणशिंग फुंकलं
३. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन बारामतीच्या दौऱ्यावर
४. बारामतीवर भाजप आपलं अस्तित्व निर्माण करेल का?

 

गेल्या आठ ते दहा वर्षांत भाजप अनेक निवडणुकांमध्ये यशस्वी होतोय. त्यासाठी भाजपची रणनीती, पक्षबांधणी, आणि कल्याणकारी योजनांचा तळागाळापर्यंत प्रसार अशी अनेक कारणं आहेत. आताही आगामी लोकसभा निवडणूकच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली. पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात २०२४च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग भाजपनं आतापासूनच फुंकलं. ‘आम्ही अमेठी जिंकली आता बारामतीतही यश मिळवू’ अशी घोषणा भाजपने केली. याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१९मध्ये राहुल गांधी यांचा पराभव केला होता. मात्र बारामती आणि अमेठीतील स्थिती वेगळी असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
भाजपचा बारामती जिंकण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही. २००९ साली सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ ची निवडणूक मोदी लाटेत पार पडली. त्यावेळेस नरेंद्र मोदीसुद्धा आले होते. त्यात सुप्रिया सुळेंचं मताधिक्य ७० हजारांवरच आलं. २०१९ च्या प्रचारामध्ये अमित शहासुद्धा आले होते. मात्र, बारामती बळकाऊ शकले नाही. बारामतीमध्ये गेल्या ४५ वर्षांत शरद पवार यांच्या कुटुंबातील किंवा पवार यांनी दिलेला उमेदवार विजयी झाला. त्यामुळे २०२४मध्ये बारामती जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच प्रयत्न चालवले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, दौंड आणि खडकवासला हे सहा मतदार संघ आहेत. त्यात बारामतीमध्ये अजित पवार तर इंदापूरमध्ये दत्ता भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर अन्य चार मतदार संघात भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार प्रतिनिधित्व करतात. संघटनात्मकदृष्ट्या या सहाही मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली. त्यामुळं बारामतीत भाजपला शह देणं कठीण आहे. दुसरं म्हणजे, बारामतीत पवारांनी बऱ्याच अंशी विकास केलेला आहे. त्याकडे मतदार दुर्लक्ष करणं नाही. शिवाय, बारामती शहरात उद्योग, शिक्षण, सहकार क्षेत्रातील नामांकित अशा संस्थांची उभारणी करण्यात पवारांचं मोठं योगदान आहे. संस्थात्मक कामामुळे लोक पवारांशी जोडले आहेत. त्यामुळं बारामतीवर पकड निर्माण करायची असेल तर भाजपला पवारांचं मोठं आव्हान आहे. बारामती जिंकण्यासाठीच केंद्रीय अर्थमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीकडे या मतदारसंघाची जबाबदारी आहे. अमेठीतून गांधी परिवार निवडून येत होता आणि त्याला ते गृहित धरत होते. त्यांनी फार काही तिथे केलेलं नाहीये. मात्र, बारामतीचं तस नाहीये. बारामतीवर पवारांची पकड घट्ट आहे. त्यामुळं दरम्यान, आगामी निवडणूकीत बारामतीवर भाजप आपलं अस्तित्व निर्माण करेल का, हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!