Just another WordPress site

‘कन्नड’ ची मालमत्ता जप्तीवर कर्जत बंद का नाही ?, राम शिंदेंनी घेतला विरोधकांचा समाचार 

कर्जत, दि. २७ (प्रतिनिधी) – औद्योगिक वसाहतीचा सदोष प्रस्ताव शासनाने नाकारला तरी कर्जत बंद? शासनाने आता कोंभळी येथील जागेसाठी तत्वतः मंजुरी दिली तरी कर्जत बंद ? कोणावर ईडीची (ED) कारवाई झाली तरी कर्जत बंद ? कर्जत बंद करणाऱ्या बंदबहादरांनी कन्नड साखर कारखान्याची मालमत्ता इडीने जप्त केल्यावर कर्जत बंद का केले नाही ? असा सवाल करत आ. प्रा. राम शिंद (Ram Shinde) यांनी राजकीय भूमिका घेऊन बंद करणाऱ्यांवर टीका केली. (Ahmednagar Politics)

‘…तर हे महाराष्ट्राचे आणि संविधानाचे दुर्दैव’, संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका 

एमआयडीसीला तत्वतः मंजुरी मिळाल्याची अधिसूचना निघाली म्हणून मिरजगाव येथे नागरिकांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला. आमदार शिंदे यांना नागरिकांनी लाडू भरवत त्यांचा सत्कार केला. आ. शिंदे यांनी एमआयडीसी संदर्भातील केलेल्या प्रयत्नांची माहिती आणि विरोधकांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला.

वालवड सुतगिरणी संदभांत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा देखील समाचार घेतला. रोहयो विहिरीच्या चौकशीसाठी कोणी दबाव आणला? माहिती कागदपत्रासहित जनतेपुढे मांडू, असा इशारा दिला. मोफत पाणीपुरवठा करण्याचे नाटक सेवाभावी संस्था पुढे करत करायचे आणि झेपत नाही म्हणून शासनाकडे परवानगीची नाटके करत बंद करायचे. तुमच्या राजकारणासाठी जनतेला तुम्ही वेठीस धरू नका. तुम्ही जनतेला मोफत पाणी देऊ शकत नाही, फक्त देण्याचे नाटक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करता, आता त्याचा फारसा उपयोग होणार नाही हे तुमच्या लक्षात आल्यामुळे परवानगीचे नाटक तुम्ही बंद केले आहेत. कर्जत-जामखेडमधील जनतेचे हिरे का भाजता? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

वंचितचा ‘मविआ’सोबत काडीमोड! प्रकाश आंबेडकरांची स्वबळावर लढण्याची घोषणा, उमेदवारांची पहिली यादी जाहीर  

एमआयडीसी इतक्या कमी कालावधीत मंजूर होणे हेच मुळात विरोधकांच्या पचनी पडलेले नाही. त्यातही एमआयडीसाठी जागा लोकांनी निवडलेली आहे. अवर्षणप्रवण भागातील जनतेसाठी हा एक मोठा दूरगामी परिणाम करणारा निर्णय होणार आहे. त्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत. त्यांना फक्त व्यवहार कळतो. कोणाचे तरी आर्थिक हितसंबंध जपताना जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे त्यांचे धोरण आहे. आमदार आणि मविआ सत्तास्थानी असण्याच्या काळात कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक त्यांच्याकडून झालेली नाही, त्यामुळे ते उद्विग्न अवस्थेत असून बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहेत, असा टोला आ. राम शिंदे यांनी लगावला.

यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, अमृत लिंगडे, प्रशांत बुद्धिवंत, नितीन खेतमाळस, डॉ. रमेशचंद्र झरकर, संदिप बुद्धिवंत, संपत बावडकर, लहू वतारे, नंदू नवले, तात्या खेडकर, दत्ता मुळे, काशिवर बुद्धिवंत, संतोष कोरडे, कैलास बोराडे, सारंग घोडेस्वार, मिनिनाथ शिंदे, हरिदास केदारी, सोमनाथ सावळे, संग्राम घोडके आदींसह परिसरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!