Just another WordPress site

PM नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार

पुणे : राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. निमित्त ठरलंय यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. (Lokmanya Tilak National Award) हे पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. (Lokmanya Tilak Award announced to PM Modi)

दरवर्षी १ ऑगस्ट रोजी अर्थात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरणं केलं जातं. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.

हे ही वाचा : ‘अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्याचं BJP चे आश्वासन;’ पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

मंगळवारी १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३वी पुण्यनिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते शरद पवार यांना देखील या पुरस्कार सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसने केला विरोध
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लोकमान्य टिळक यांच्या विचारांशी कधीपासून जुळायला लागले,’ असा सवाल उपस्थित करून शहर आणि प्रदेश काँग्रेसने थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच डॉ. रोहित टिळक यांच्याविषयी तक्रारीचा सूर आळवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!