Just another WordPress site

ओवैसींनी लोकसभेत दिल्या बाबरी मशीद झिंदाबादच्या घोषणा

नवी दिल्ली: राम मंदिरावर (Ram temple) संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार डिसेंबरच्या घटनेचा उत्सव साजरा करत असल्याचा आरोप करताना ओवैसी यांनी प्राणप्रतिष्ठापनेच्या २२ जानेवारीच्या सोहळ्याचा दाखला देत सरकार फक्त एका धर्माचे आहे काय, असा सवाल केला. तसेच बाबरी मशीद (Babri Masjid) झिंदाबादच्या घोषणाही दिल्या.

Electoral Bond: भाजप मालामाल, काँग्रेस कंगाल; इलेक्टोरल बाँड्सचा ऑडिट रिपोर्ट जाहीर 

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकार हे एका धर्माचे सरकार आहे की सर्व धर्मांचे पालन करणारे सरकार आहे, या सरकारचा काही धर्म आहे का, २२ जानेवारीचा संदेश देऊन या सरकारला एका धर्माचा दुसऱ्या धर्माच्या अनुयायांवर विजय झाल्याचे दाखवायचे आहे का, राज्यघटना ही परवानगी देते का, अशा सवालांच्या फैरी ओवैसी यांनी झाडल्या.

सहा डिसेंबरच्या घटनेचा सरकार- उत्सव साजरा करत असल्याचा आरोप खासदार ओवैसी यांनी केल्यानंतर पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी संसदेतील चर्चा ६ डिसेंबरबद्दल नव्हे, तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेशी निगडित असल्याची आठवण करून दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राम मंदिराचे बांधकाम झाले आहे.

इंडिया आघाडी विखुरणार! पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार केजरीवालांच्या घोषणेने ‘इंडिया’ला आणखी एक धक्का 

पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, अयोध्येत मूळ जागी मंदिर होते, याचे दाखलेही दिले. त्यावर आक्षेप घेताना ओवैसी यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा अहवाल फेटाळला होता. मंदिर पाडून बाबरी मशीद बांधलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असल्याचा दावाही ओवैसी यांनी केला.

अल्पसंख्याक समाजाची फसवणूक झाल्याची खंत व्यक्त करताना ओवैसी म्हणाले, १९४९ मध्ये आमची फसवणूक झाली, १९८६ मध्ये फसवणूक झाली, १९९२ मध्ये फसवणूक झाली, २०१९ मध्ये फसवणूक झाली. भारताचे नागरिक होण्यासाठी मुस्लिमांना नेहमीच मोठी किंमत मोजावी लागली. आपण बाबर, औरंगजेब किंवा जिनांचा प्रवक्ता नाही, असे सांगताना मर्यादापुरुषोत्तम रामाबद्दल आदर आहेच. मात्र नथुराम गोडसेचा तिरस्कारही आहे. बाबरी मशीद आजही अस्तित्वात असल्याचे सांगताना बाबरी मशीद झिंदाबाद अशा घोषणाही ओवैसी यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!