Just another WordPress site

Loksabha Election : भाजपची डोकेदुखी वाढली! अखेर काँग्रेस आणि आपचं जुळलं!

दिल्लीसह हरयाणा, गोवा आणि गुजरातच्या जागावाटपाचे गणित सुटले

 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) तोंडावर आली असतानाच काँग्रेस (Congress) आणि ‘आप’चे (Aam Aadami Party) जुळले असून पाच राज्यांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज दिल्लीसह हरयाणा, गोवा, चंदिगड आणि गुजरातमधील लोकसभेच्या जागावाटपाचे गणित अखेर सुटले. कोण कोणत्या जागा लढवणार यावर शिक्कामोर्तब झाल्याने भाजपची मात्र डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

Mahananda : महानंदा एनडीडीबीला देण्याचा घाट 

आम आदमी पार्टी दिल्लीत चार जागा तर काँग्रेस पक्ष तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून मुकुल वासनिक, दीपक बाबरिया, अरविंदर सिंह लवली तर ‘आप’कडून सौरभ भारद्वाज, आतिशी, संदीप पाठक यांची उपस्थिती होती. यावेळी दिल्लीसह चार राज्यांत काँग्रेस आणि आप एकत्र लढणार असल्याची घोषणा करण्यात आली. आगामी निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीतील घटकपक्ष या नात्याने आम्ही दोन्ही पक्ष मजबुतीने लढू. हायकमांडने दिलेले सर्व निर्देश इमानेइतबारे पाळू, असे अरविंदर सिंह लवली म्हणाले.

दिल्ली, चंदिगडवरून सुरू होत्या वाटाघाटी
दिल्ली व चंदिगडच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला होता. मात्र, प्रदीर्घ चर्चेनंतर दिल्लीतील सात जागांपैकी आम आदमी पक्ष नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीची जागा लढणार आहे. तर, काँग्रेस चांदनी चौक, उत्तर-पूर्व आणि उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढवेल.

उद्धव ठाकरेंचा विषय आमच्यासाठी संपला, फडणवीस यांची स्पष्टोक्ती : ठाकरेंच्या सेनेशी पुन्हा युती अशक्य 

असे ठरले जागावाटप
दिल्ली – एकूण जागा : ७
काँग्रेस – ०३
आप – ०४

गुजरात एकूण जागा : २६
काँग्रेस – २४
आप – ०२

हरयाणा एकूण जागा : १०
काँग्रेस ०९
आप – ०१

चंदिगड एकूण जागा : १
काँग्रेस – ०१

गोवा- ०२
काँग्रेस – ०२
आप- ०१

बंगालमध्येही जमणार?
प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ५ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून जागावाटपाचा तिढा सुटण्याची आशा आहे.

केजरीवालांना अटक केल्यास देशात त्सुनामी
काँग्रेससोबत आघाडी करू नये यासाठी भाजपकडून धमक्या मिळत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची धमकी दिली जात आहे, परंतु केजरीवाल यांना अटक झाली तरीही काँग्रेससोबत असलेली एकजूट कायम राहील. ज्या दिवशी केजरीवाल यांना अटक केली जाईल त्या दिवशी संपूर्ण देशात ‘आप’च्या समर्थनार्थ देशात त्सुनामी येईल. भाजपचे संपूर्ण राजकीय गणित बिघडेल, असा इशारा ‘आप’ने भाजपला दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!