Just another WordPress site

Ahmednagar News : अवकाळीने आणली शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’, ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव

अहमदनगर: सलग दोन वर्षांपासून शेती व्यवसाय वातावरणाच्या लहरीपणामुळे तोट्यातच जात आहे. शेतकऱ्याचे (farmer) संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असतानाच अवकाळी पाऊस (Unseasonal rain) शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या रब्बीच्या पिकांना (Crop Loss in Maharashtra) मंगळवारी पुन्हा पावसाने (Rain Updates) झोडपले. नगर शहरासह, तालुक्यात व जिल्ह्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. (Ahmednagar Rain)

Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांचा निकाल असो, ‘या’ आमदारांना धोका नाही 

राज्यात दोन दिवसापूर्वीच अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार पुन्हा मंगळवारी सकाळपासूनच अवकाळी सरी बरसल्या. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर अनेक ठिकाणी सूर्यदर्शनही झाले नाही. ढगाळ हवामान अन् अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर संक्रांत ओढवली आहे. नोव्हेंबर महिन्यात २६ ते ३० दरम्यान तसेच ६ जानेवारी रोजी ही जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यात रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून बचावलेल्या कांदा, गहू, तूर, मका फळबागांचे आता पुन्हा झालेल्या पावसाने नुकसान होणार आहे. अनेक भागात लाल कांदा काढणीच्या टप्प्यात आलेला असून तेथे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच गव्हाचे पीकही चांगले आहे. मात्र, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे.

पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतकरी चिंतेत होता. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार हे निश्चित आहे. रब्बी हंगामातील पिकांची पाण्याअभावी शाश्वती नसताना देखील अशाही परिस्थितीत हताश न होता शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळीने मोठ्या कष्टाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर दिसून येत आहे. गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो तर हरभरा पिकावर घाटी अळी, कांदा लसूण पिकांवर करपा, डाऊनी, मावा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. काढणीला आलेला कांदा गाभ्यात पाणी गेल्याने सडणार आहे. एकंदरीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोरील संकटात भरच पडली आहे. डिसेंबर महिन्यातील गुलाबी थंडीने रब्बी पिके जोमात आली होती. त्यामुळे उत्पन्नाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. खराब हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसणार असून उत्पन्नात देखील घट होणार आहे. शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्याचा देखील प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाचे पडलेले भाव आणि दुसरीकडे निर्सगाचा लहरीपणा या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

अवकाळीने फळबागांसह रब्बी पिकांना फटका

श्रीगोंदा : तालुक्यात अनेक भागात मंगळवार (दि.९) सकाळ पासून दिवसभर अवकाळी रिमझिम पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच ढगाळ वातावरण व वाढलेली कडाक्याची थंडीमुळे वृद्ध आजारी पडत त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार श्रीगोंदा शहर, कोळगाव, घारगाव, पारगाव, बेलवंडी, मढेवडगाव काष्टीसह तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पावसाने सकाळी हजेरी लावली आहे. सकाळपासूनच या परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. दरम्यान या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागा, फळबागा, कांदा, गहू, ज्वारी, हरभरा यावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गहू, ज्वारी पिकांवर तांबेरा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!