Just another WordPress site

पोरांनो, शहाणं असाल तर अभ्यास करा! ‘ही’ परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यास पुढील वर्गात प्रवेश नसणार

नागपूर : आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या धोरणात राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) बदल केला आहे. या वर्षीपासून बोर्डाच्या परीक्षेप्रमाणेच (Board Exam) पाचवीच्या विद्यार्थ्यांची ५० गुणांची, तर आठवीच्या विद्यार्थ्यांची ६० गुणांची वार्षिक परीक्षा (Additional examination) घेतली जाणार आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील १ लाख २९ हजार २२६ विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे. राज्य सरकारने या परीक्षेची आणि त्यांच्या मूल्यमापनाची कार्यपद्धती जाहीर केली आहे.

Ahmednagar News : अवकाळीने आणली शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’, ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव 

राज्यात २०१०-११ पासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती’ लागू करण्यात आली. त्यानुसार मूल्यमापनात ‘ड’ श्रेणी मिळालेल्या अथवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करता त्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जात होता. मात्र त्यातून विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. तसेच विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश द्यायचा असल्याने त्यांना मागील वर्गातील अध्ययन कौशल्य अपेक्षित प्रमाणात मिळाले नसले तरी त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा लागत होता. त्यातून मुलांच्या पुढील अध्ययनात अडथळा येत असे. या पार्श्वभूमीवर आता इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता पाचवीच्या विद्यार्थ्यांची १० गुणांची तोंडी आणि ४० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तर आठवीच्या विद्यार्थ्यांची १० गुणांची तोंडी आणि ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांचा निकाल असो, ‘या’ आमदारांना धोका नाही 

नागपुरात जिल्हा परिषद, महापालिका, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित आदी माध्यमांतील इयत्ता पाचवीमध्ये ११६३ शाळांतील ६० हजार ५३३ विद्यार्थी आणि इयत्ता आठवीत ५६२ शाळांतील ६८ हजार ६९३ विद्यार्थी आहेत. या परीक्षा दुसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. परीक्षेत विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळवावे लागतील. विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास त्यांना शाळेतील शिक्षकांकडून अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केल्या जाईल. त्यानंतर या विद्यार्थ्यांची जून महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. या पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

पुढील परीक्षांसाठी तयार करणे उद्देश
नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी किमान अपेक्षित अध्ययन कौशल्य प्राप्त केले की नाही, याची खात्री करता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावण्यासह पुढील शैक्षणिक आव्हाने आणि स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याचा उद्देश असल्याचे सरकारकडून नव्या निर्णयाचे समर्थन करताना सांगण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, राज्य सरकारने या परीक्षांचे सनियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका तसेच केंद्रस्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा शाळास्तरावर घेतल्या जातील. मात्र परीक्षेच्या वेळेस केंद्रस्तरीय भरारी पथके तयार करून शाळांना भेटी दिल्या जाईल. त्यानुसार या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी काळजी घेतली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातही जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून या समित्यांचे गठन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!