Just another WordPress site

Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांचा निकाल असो, ‘या’ आमदारांना धोका नाही

Shiv Sena MLA Disqualification : शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होती. 20 डिसेंबर 2023 रोजी सुनावणी संपली. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष निकाल जाहीर करणार आहेत. शिवसेन शिंदे गटातील आमदार अपात्र होणार की ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या राजकीय तणावात दोन आमदारांना कोणताही धोका नाही. आदित्य ठाकर (Aditya Thackeray)आणि ऋतुजा लटके (Rituja Latke) या दोन आमदारांना अपात्रतेच्या निकालाचा काहीही फरक पडणार नाही. हे दोन्ही आमदार ठाकरे गटाचे आहेत.

सुमारे दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्याने राजकीय वातावरण तापले होते. ठाकरे गटाकडून व्हीप आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात सुमारे वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात काही गोष्टी स्पष्ट केल्या आणि विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेची सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करणार आहेत.

आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांच्याविरोधात कारवाई का नाही?
शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाच्या विरोधात आमदार अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे नाव कारवाईतून वगळण्यात आल्याचे शिंदे गटाने जाहीर केले होते. ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कोणतीही कारवाई करणार नसल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले. तर ठाकरे गटातील इतर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती.

आमदार ऋतुजा लटके याही आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून दूर राहणार आहेत. त्यांचे पती आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्याच दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्यात येत असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल देण्यात आली. ऋतुजा लटके यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळं त्यांच्याविरोधात कारवाई करता येत नाही. लटकेंनी मशाला चिन्हावर निवडणूक लढली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. ठाकरे गटाच्या नवीन निवडणूक चिन्हावर निवडून आलेल्या त्या पहिल्या आमदार ठरल्या.

अपात्रतेची टांगती तलवार असणारे आमदार
शिंदे गट-
1.) एकनाथ शिंदे
२) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव
६) संदीपान भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमुलकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार
1) अजय चौधरी
२) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
५) नितीन देशमुख
६) सुनील राऊत
७) सुनील प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावकर
10) प्रकाश फातर्फेकर
11) कैलास पाटील
12) संजय पोतनीस
13) उदयसिंग राजपूत
14) राहुल पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!