Just another WordPress site

Asha Workers Strike : आशा आणि गटप्रवर्तक पुन्हा संपावर, १२ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा

वर्धा : शासनाच्यावतीने सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावं (Dr. Tanaji Sawant) यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोग्य विभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या दालनात आशा गटातील कृती समितीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करून आशा वर्कर (Asha Worker) यांना सात हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळं गटप्रवर्तकांनी संप मागे घेतला होता. मात्र, शासनाने आज पर्यंत शासन निर्णय निर्गमित न केल्यामुळे नाईलाजाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती १२ जानेवारी २०२४ दिनापासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाला रीतसर संविधानिक पद्धतीने संपाबाबत (Asha Worker samp) नोटिस देण्यात आलेली आहे.

Disability fund : वेगळे मंत्रालय दिले, पण दिव्यांग आर्थिकदृष्ट्या विकलांगच! पाच महिन्यांपासून निधी रखडला 

महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने मागील १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत मानधन वाढीसह इतर मागण्यांना घेऊन संप करण्यात आला होता. शासनाने ११ जानेवारीपर्यंत शासन निर्णय काढले नाही तर १२ जानेवारी २०२४ पासून जोपर्यंत शासन निर्णय काढत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे नाही, अशी माहिती आशा वर्कर जिल्हाध्यक्ष जोशना राऊत व गटप्रवर्तक जिल्हा अध्यक्ष शबाना शेख यांनी दिली आहे.

याबाबतची सूचना जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रा. ज. पराडकर यांना जोशना राऊत, वैशाली नंदरे, पुष्पा शंभरकर, सोनाली खैरकर, सीमा बेले, प्रतिभा वाघमारे, रूपाली बावणे अनिता बंगाले, नीलिमा कळसकर यांच्या शिष्टमंडळाने पूर्वसूचनेचे निवेदन देण्यात आले आहे.

Ahmednagar News : अवकाळीने आणली शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’, ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वेतन सुसूत्रीकरण सुरू केलेले असून ते गटप्रवर्तकांना तात्काळ लागू करावा अशी मागणी केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये १५ वर्ष पासून ४ हजार गट प्रवर्तक व ७० हजार आशा कार्यरत आहेत. गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ता दिला जातो. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या कर्मचारी दर्जा द्या व सामाजिक सुरक्षा लागू करा, किमान वेतन द्या, आशा वर्कर यांना ऑनलाईन कामासाठी दबाव आणला जातो आहे तो त्वरित थांबवावा, ऑनलाईन कामे आशा करणार नाही, बहूसंख्य आशा अल्प शिक्षित आहे, त्यांना आरोग्य विभागातील इंग्रजित असलेले अॅपवर काम करता येतं नाही. त्यामुळे ऑनलाईन कामे सांगणे बंद करावे, दिवाळी भाऊबीज लागू करा, आशा, गटप्रवर्तक ना किमान वेतन लागू करा आदि मागण्या आहेत. तरी वर्धा जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकाने या संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जोशना राऊत, शबाना शेख, प्रतिभा वाघमारे यांनी केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!