Just another WordPress site

जो कोणी ‘या’ चेअरवर बसला त्याचा मृत्यू झाला; ३२० वर्षांपासून ब्रिटनच्या संग्रहालयात आहे शापित चेअर! काय आहे शापित चेअरचा इतिहास?

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात किंवा बोलल्या जातात, ज्याच्यावर बऱ्याचदा आपण विश्वास ठेवत नाही. लोक बरंच काही बोलताना दिसतात. मात्र, सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही. पण अशा देखील काही गोष्टी असतात किंवा घडतात, ज्या अखेर लोकांना विश्वास ठेवायला भाग पाडतात. त्यांपैकीच एक आहे ती म्हणजे शापित खूर्ची. खरंतर खुर्ची हे व्यक्तीच्या बसण्यासाठीचे उत्तम साधन आहे. या खुर्चीवर बसून व्यक्ती विश्रांती घेतो. पण एक खुर्ची अशीही आहे की, एकदा त्या खुर्चीवर व्यक्ती बसला की, त्याचा मृत्यू होतो. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल मात्र हे खरं आहे. एक खुर्ची अशीही आहे जी तिच्या विचित्र रहस्यामुळे चर्चेत राहिली आहे. याच शापित खुर्चीचे रहस्य जाणून घेऊ.

भयानक कथा ऐकताना किंवा तसे चित्रपट पाहताना अनेकदा जुने पडके वाडे, घरे वास्तू शापित असल्याचे सांगितले जाते. हे काल्पनिक आहे याची माहिती असूनही ते चित्रपट बघताना, गोष्टी ऐकताना भितीने आपला थरकाप उडतो. पण, खरंच अशा काही शापित वास्तू, काही ठिकाणे अस्तित्वात आहेत का, असा विचार आल्याशिवाय राहत नाही. भारतात तर अशा गोष्टींची भिती घालणाऱ्या अनेक कथा सापडतील. पण, परदेशातही एका वास्तूसंग्रहालयात एक खुर्ची आहे. जी शापित खुर्ची म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्लंडमधील ही शापित खुर्ची थर्स्कच्या संग्रहालयात आहे. ती शापित खुर्ची ३२० वर्ष जुनी असून तीने आजवर अनेकांचे जीव घेतले आहेत.

अठराव्या शतकात इंग्लंडमधील थर्स्क येथे थॉमस बस्बी नावाचा एक माणूस राहत होता. त्याचा डॅनियल ऑटी नावाचा एक खास साथीदार होता. हे दोघेही खोटी नाणी बनवण्याचे बेकायदेशीर काम करायचे. डॅनियल हा थॉमसचा अत्यंत चांगला मित्र तर होताच. पण, थॉमसने डॅनियलची मुलगी एलिझाबेथशी लग्नही केले होतं, असं सांगण्यात येतं.. ज्यानंतर दोघे जावई-सासरे झाले. पुढे ही मैत्री आणखीनच घट्ट होत गेली. रोज काम संपल्यावर हे दोघे थर्स्क येथील त्यांच्या आवडत्या बारमध्ये एकत्र दारु प्यायला बसायचे आणि तिथे भरपूर मद्यपान करायचे. थॉमस या बारमध्ये नेहमी एकाच खुर्चीवर बसत होता. त्यामुळे त्याला त्या खुर्चीविषयी एक विशेष आकर्षण होतं. . जर त्या खुर्चीत इतर कोणी बसलं तर थॉमस त्या व्यक्तीशी भांडायचा. मग, बळजबरीने त्या व्यक्तीला त्या खुर्चीवरुन हटवून तो स्वतः त्यात बसायचा. पण, हीच खुर्ची पुढे जाऊन अनेकांचे प्राण घेईल अशी कल्पनाही कोणी केली नसेल.

१७०२ मध्ये एके दिवशी त्या बारमध्ये थॉमस आणि डॅनियल यांच्यात कशावरुन तरी भांडण झालं आणि हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. यानंतर डॅनियल थॉमसला चिडवण्यासाठी त्याच्या त्या आवडत्या खुर्चीत बसला. हे पाहून थॉमसचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात डॅनियलचा म्हणजेच त्याच्या सासऱ्याचा खून केला.

या घटनेनंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपात थॉमसला अटक केली. त्यानंतर थॉमसला सासऱ्याच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्या फाशीचा दिवस आला. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती, त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. फाशी देण्यापूर्वी आपली शेवटची इच्छा व्यक्त करताना थॉमसने सांगितले की, थिर्स्क येथील बारमध्ये त्याच्या आवडत्या खुर्चीत बसून त्याला त्याचं शेवटचे जेवण करायचं आहे. थॉमसची ही अखेरची इच्छा मान्य करण्यात आली आणि त्याला त्याच बारमध्ये नेण्यात आले. त्या खुर्चीत बसून त्याने त्याचं अखेरचं जेवण केलं. जेवण केल्यावर तो उभा झाला आणि म्हणाला की, ‘जो कोणी माझ्या खुर्चीत बसण्याची हिंमत करेल तो मरेल’. तेव्हापासून ही खुर्ची शापित झाली आहे, असं म्हणतात.

दरम्यान, दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयल एन्फोर्सर्सचे दोन पायलट त्या बारमध्ये आले आणि त्याच शापित खुर्चीवर बसले. त्यानंतर ते दोघे बारमधून बाहेर येताच त्यांच्या कारला अपघात झाला आणि दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. यानंतर या खुर्चीवर जी कोणती व्यक्ती बसली त्याचा गूढ मृत्यू झाला. बारमध्ये येणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळ नको, असा विचार करून त्या बारच्या मालकाने ही खुर्ची पबच्या गोडाऊनमध्ये ठेवली. मात्र, इथेही या खुर्चीने लोकांचा जीव घेतला. एकदा गोदाममध्ये एक मजूर थकल्यानंतर त्या खुर्चीवर बसला. नंतर एक तासांनंतर एका रोड अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बार मालकाने ही खुर्ची एका म्युझिअमला दान केली. तेव्हापासून ५ फूट उंचीवर ही खुर्ची लटकवण्यात आली आहे. जेणेकरून चुकूनही यावर कुणी बसू नये.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!