Just another WordPress site

काय सांगता! पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यावर मिळतंय तब्बल १ कोटींच पेन्शन

लंडनः ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या ४५ दिवसांत हे पद सोडण्याची नामुष्की ट्रस यांच्यावर ओढवली आहे. पंतप्रधान पद सोडल्यानंतर ट्रस यांना आता पेन्शन लागू झाली आहे. लिझ ट्रस यांना सरकारकडून १,१५,००० पाउंड दरवर्षी पेन्शन मिळणार आहे.

लिस ट्रस या जरी ४५ दिवसच पंतप्रधानपदी राहिल्या असल्या तरी त्यांना आता आयुष्यभरासाठी पेन्शन लागू झाली आहे. सरकारकडून १, १५,००० पाउंड दरवर्षी मिळणार आहेत. भारतीय रुपयांनुसार एक कोटींपेक्षा अधिक पेन्शन ट्रस यांना मिळणार आहे. ट्रस यांना मिळणारी पेन्शन ही जनतेने भरलेल्या करातून दिली जाणार आहे. पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम पब्लिक ड्यूटी कोस्टस अलाउंसच्या माध्यामातून दिली जाते.

पंतप्रधानपद सोडल्यानंतर माजी पंतप्रधान निवृत्तीनंतरही सक्रीय राहू शकतील या हेतूने ही ही योजना सुरू केली आहे. सरकारच्या गाइडलाइननुसार, ही पेन्शन माजी पंतप्रधानांना त्यांची सामाजिक कर्तव्य सुरू ठेवण्याकरता व ती पूर्ण करण्याकरिता दिली जाते. १९९१मध्ये याची सुरुवात झाली होती. मार्गारेट थेचर यांनी राजीनामा दिल्यानंतर जॉन मेजर यांनी ही योजना सुरू केली होती.

 

लिज ट्रस यांनी राजीनामा का दिला?

गेल्या महिनाअखेरीस ट्रस यांनी मांडलेले ‘मिनी बजेट’ वादात सापडले. त्यानंतर त्यातील तरतुदी मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. त्यातील करकपातीच्या धोरणामुळे ट्रस या सर्वाधिक अडचणीत आल्या. त्यानंतर सत्ताधारी हुजूर पक्षाच्याच खासदारांनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली. त्यामुळे ट्रस यांची पक्षातील लोकप्रियता झपाट्याने घटली. त्यांचे करकपातीचे धोरण हे केवळ श्रीमंतांच्या फायद्याचे ठरत असून, याचा मजूर पक्षालाच लाभ होत असल्याचे मत हुजूर पक्षाचे प्रतिनिधी मांडू लागले. ट्रस यांनी महिनाभरात घेतलेल्या निर्णयांवर हुजूर पक्षाच्या ‘१९२२ कमिटी ऑफ बॅकबेंचर’ या गटानेही नाराजी व्यक्त केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!