Just another WordPress site

काळाचा घाला! दिवाळीसाठी घरी जाणाऱ्या प्रवाशांच्या बसला अपघात, १५ जण जागीच ठार, ३५ जण जखमी

मध्यप्रदेश : ऐन दिवाळी झालेल्या बस अपघातात १५ जणांचा आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शुक्रवारी रात्री मध्यप्रदेशात घडली. हे सर्वजण दीपावली साजरी करण्यासाठी घरी जात होते. या अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ३५ जण जखमी झाले आहे. मध्य प्रदेशाच्या रेवालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर एका बसला भीषण अपघात झाला आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी सतनाला येत आहेत. सोहागी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना रुग्णालयात त्योंथर सरकारी रुग्णालयात हलवले.त्योंथर रुग्णालयात मध्यरात्री १ वाजेपर्यंत ५५ जणांना दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने सोहागी डोंगरावर मदत कार्य सुरु केले आहे. मदतीसाठी काही क्रेनही आरटीओ मनीष त्रिपाठी यांनी बोलावले आहेत.

सोहागी डोंगरावरून उतरणारी एक बस समोरच्या एका ट्रेलरमध्ये शिरली. बस हैदराबादून रेवामार्गे गोरखपूरला जात होती. हा अपघात शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास घडला. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही.

डोंगरावरून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.बसच्या कॅबिनमध्ये जवळपास ३-४ प्रवाशी अडकले होते. जखमींत बहुतांश कामगारांचा समावेश आहे. सर्वजण दीपावली साजरी करण्यासाठी घरी जात होते.या अपघाता मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत देण्याचे मध्यप्रदेश सरकारने जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!