Just another WordPress site

सलमान खानला ‘या’ आजाराने ग्रासले, आता बिग बॉसमध्ये दिसणार नाही सलमान; कोण करणार बिग बॉसचे सूत्रसंचालन?

बिग बॉस नाव घेतलं तर समोर येतो तो बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. त्याच्याशिवाय बिगबॉस पाहण्याला तेवढी मज्जा नसल्याचं चाहत्यांच मत आहे. त्याच्या आवाजाने आणि बॉसगीरीने तो शोच्या स्पर्धकांना सोबत बाधूंन ठेवतो. मात्र, बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आता एक वाइट बातमी समोर आलीये. सलमान खान काही दिवस बिग बॉस शो होस्ट करणार नसल्याचं समजतंय. मग आता हा लोकप्रिय शो कोण होस्ट करणार असा प्रश्न उपस्थित झालाय.

 

महत्वाच्या बाबी

१. सलमान काही दिवस बिग बॉस शो होस्ट करणार नाही
२. बिग बॉसमध्ये सलमान खानच्या जागी आता करण जोहर
३. सलमान नसल्याने बिग बॉसच्या टीआरपीवर परिणाम!
४. करण जोहर बिग बॉसच्या घरात काय धमाका करतो?

 

सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये बिग बॉस हिंदीच्या नव्या पर्वाची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून सलमान खानने या प्रसिद्ध शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केले. आता बिग बॉस आणि सलमान खान हे समीकरण तयार झाले. बिग बॉस १६ मध्ये यावेळी ‘वीकेन्ड का वार’ शुक्रवार आणि शनिवारी ठेवण्यात आला. गेल्या दोन आठवड्यात सलमान खाननं या दोन्ही दिवशी घरातल्या सदस्यांची धुलाई केलेली नजरेस पडली होती. पण यावेळी शुक्रवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सलमान खान दिसला नाही. या सीझनचा वीकेंड का वार या भागाची होस्टिंग सलमान खान करतो. तो भाग शुक्रवार आणि शनिवारी प्रसारित केला जातो. मात्र यावेळी शुक्रवारी प्रसारित झालेल्या नव्या एपिसोडमध्ये सर्वजण सलमानची वाट पाहत होते, मात्र, तो शोमध्ये आलाच नाही. शोमध्ये भाईजान दिसला नसल्याने चाहते टेन्शनमध्ये आले होते. नंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली की सलमानला डेंग्यू झाला असल्यानं तो आजारी आहे. त्यामुळंच सलमान बिग बॉसमध्ये घरातील सदस्यांचा क्लास घेताना दिसणार नाहीये. सलमान खान बिग बॉसचा विकेंडचा वार होस्ट करणार नसल्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानची गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब झाली होती. आता तपासणी केल्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झालं. आणि त्याला डॉक्टरांनी घरी राहून आराम करायचा सल्ला दिलाय. त्यामुळे आता काही दिवस तो हा शो होस्ट करणार नसून आता त्यांच्या जागी करण जोहर हा शो होस्ट करणार असल्याची माहिती समोर आली. यासाठी सलमानने त्याला स्वत:हून शोमधील पुढच्या भागांचे होस्टिंग करण्यासाठी राजी केले. त्यामुळं आता करण जोहर या शोचे काही भाग होस्ट करणार आहे. यापूर्वीही करणने बिग बॉसच्या ओटीटीवरिल पहिला सीझनही होस्ट केला होता. सलमानच्या आजारामुळे करणकडे काही दिवसांसाठी बिग बॉस १६ ची कमान देण्यात आली.

दरम्यान, अनेकजण फक्त आणि फक्त सलमान खानसाठीच बिग बॉस बघतात. मात्र, आता पुढील काही दिवस सलमान खान बिग बॉसमध्ये दिसणार नसल्याने याचा परिणाम बिग बॉसच्या टीआरपीवर नक्कीच पडणार आहे. करण जोहर आता बिग बॉसच्या घरात काय धमाका करतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!