Just another WordPress site

केंद्रीय मंत्री दानवेंच्या मुलीचा शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा

औरंगाबाद : राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना आणि भाजपचे नवे सरकार सत्तारूढ झाले आहे. पण औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा भाजप नेत्यांकडूनच सरकारविरोधात मोर्चा काढण्याचं ठरलं आहे. पक्षाने संधी दिली तर मी कन्नड-सोयगांवमधून विधानसभा (Assembly from Kannada-Soigaon) लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve, Minister of State for Central Railway) यांच्या कन्या संजनाताई जाधव (Sanjana Jadhav) मैदानात उतरल्या आहेत. शेतकरी, गोरगरिबांच्या मागण्यासाठी पिशोरमध्ये मंगळवारी (ता.२१) त्यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपच्याच केंद्रीय मंत्र्यांची मुलगी मोर्चा काढत असल्याने चर्चेला उधान आले आहे.

सिल्लोडमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. आता भाजप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असतांना आधी सिल्लोड आणि आता (Kannad)कन्नडमध्ये मोर्चा निघत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजना जाधव या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. (Bjp) कन्नड तालुक्यात त्यांच्या चांगला जनसंपर्क देखील आहे. त्या जोरावरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या आपल्या विरोधकांना आव्हान देणार आहेत.

हेही वाचा : Nandamuri Taraka Ratna passes away: Junior NTR च्या भावाचं निधन, अनेक सिनेमांत साकारल्या भूमिका वयाच्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हर्षवर्धन जाधव यांनी नुकतेच आपण विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, असे जाहीर केले होते. त्यानंतर संजना जाधव यांनी थेट मोर्चा काढत विधानसभेसाठीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. कन्नड-सोयगाव तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी स्वावलंबन आणि श्रावणबाळ योजनेतील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, उर्वरित गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा, पी.एम. सन्मान निधीचा लाभ मिळावा, 2021-22 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहे. संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच मोर्चा निघत असल्याने राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दानवे यांनी देखील मुलीला आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड-सोयगांव मतदारसंघात जाधव विरुद्ध जाधव असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!