Just another WordPress site

MLA Santosh Bangar यांच्या अडचणीत वाढ, ठाकरेंना उत्तर देणाऱ्या कावड यात्रेत तलवार फिरवणं भोवलं, पोलिसांत गुन्हा दाखल

हिंगोली : हिंगोलीतील दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार निशाणा साधत टीका केली. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना लक्ष्य केलं. मटक्याचा धंदा करणारा हिंदुत्ववादी कसा असू शकतो, गद्दार आम्हाला बेडकुळ्या दाखवत आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान, काल उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी आमदार बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. यावेळी बांगर यांनी हातात तलवार दाखवत शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी (Kalamanuri Police) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

उद्धव ठाकरेंनी हिंगोलीतील सभेत शिंदे गटावर जोरदार टीका केली. ही टीका आमदार संतोष बांगर यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी त्यांनी काल कावड यात्रा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यांच्या या यात्रेला गावागावांतून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काल श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने आमदार बांगर यांनी कळमनुरी शहरात कावड ही कावड यात्रा काढली होती. यावेळी त्यांनी महादेवाला अभिषेक केला. यासोबतच त्यांनी भगवे वस्त्र नेसत गळ्यात आणि दंडावर रुद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या.

मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा 

दरम्यान, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. या कावड यात्रेदरम्यान शिवभक्तांनी आमदार बांगर यांचा सत्कार करून त्यांना तलवार दिली. संतोष बांगर यांनी ही तलवार म्यानातून काढून जमलेल्या समुदायाला दाखवत शक्तीप्रदर्शन केलं होतं. इतकचं नाही तर आमदार बांगर आणि त्यांचे कार्यकर्ते डीजेच्या तालावर ठेका धरताना दिसले.

याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची परवानगी न घेता त्याने डीजे लावला आणि समुदालायला तलवार दाखवली असं पोलिसांनीी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळं बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उद्धव ठाकरेंची टीका-
संतोष बांगर यांच्यावर टीका करतांना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मटक्याचा धंदा करणारा हिंदुत्ववादी कसा असू शकतो, गद्दार अनेक झाले पण हिंगोली नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली. आजही काही गद्दार आहेत. ते बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण त्या बेडकांमध्ये हवा आहे. ताकद माझ्याकडे आहे. मागे नागपंचमी झाली, या गद्दाराची नाग समजून आपम पूजा केली, पण तो उलटा फिरून डसायला लागला, अशा शब्दात बांगर यांच्यावर टीका केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!