Just another WordPress site

Sanjay Raut : न्यायव्यवस्था काहीकांची रखेल, चिन्ह मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २००० कोटींचा व्यवहार

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने (Election Commission) निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णय़ावर सातत्याने टीका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत हा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.”

या ट्विट सोबतच राऊतांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळीही शेअर केल्या आहेत. “ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली आहे. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली”, अशा या ओळी आहेत.

हेही वाचा :केंद्रीय मंत्री दानवेंच्या मुलीचा शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!