Just another WordPress site

Nandamuri Taraka Ratna passes away: Junior NTR च्या भावाचं निधन, अनेक सिनेमांत साकारल्या भूमिका वयाच्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nandamuri Taraka Ratna Passes Away : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न (Nandamuri Taraka Ratna) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नंदामुरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 23 दिवस त्यांच्या हा संघर्ष सुरू होता. 27 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. अखेर शनिवारी (18 फेब्रुवारी) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला (Southern cinema) मोठा धक्का बसला आहे.

नंदामुरी यांना 27 जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना कुप्पम येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कुटुंबियांसोबत चाहतेदेखील प्रार्थना करत होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खलावल्यामुळे त्यांचे निधन झाले.

हेही वाचा : BJP कडून भारताला गोडसेचं राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न; उपमुख्यमंत्र्यांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, नंदामुरी तारका रत्न एका पक्षाच्या पदयात्रेत सामील झाले होते. त्यावेळी गर्दीदरम्यान त्यांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुद्ध झाले. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोमामध्ये होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबियांसह अनेक राजकारणी मंडळी त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

नंदामुरी तारका रत्न यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत राजकारणातदेखील नशिब आजमावलं आहे. दाक्षिणात्य अभिनेता ज्यूनिअर एनटीआरचे (Junior NTR) ते चुलत भाऊ होते. तसेच आंधप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका (Chief Minister Nandamuri Taraka) रामाराव यांचे ते नातू होते. नंदामुरी तारका रत्न यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यांनी २००३मध्ये आलेल्या ‘ओकाटो नंबर कुर्राडू’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांनी ओटीटीवरही धमाकेदार पदार्पण केले होते. ण ज्यूनिअर एनटीआरच्या तुलनेत नंदामुरी तारका यांना कमी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या निधनामुळे साऊथ मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अल्लू अर्जुन, चिरंजीवी यांच्यासह अनेक कलाकार आणि चाहते तारक रत्न यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!