Just another WordPress site

शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले! सतत पडणाऱ्या पावसामुळे जिवापाड जपलेल्या फ्लॉवरचे पीक उपटून फेकण्याची शेतकऱ्यावर वेळ

नाशिक : सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने संतप्त होत येवला तालुक्यातील रायते येथील तरुण शेतकरी शंकर ढिकले यांनी फ्लॉवरचे पीक उपटून फेकून दिले. अक्षरशः या शेतकऱ्यानं पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून फ्लॉवरचे पीक उभे केले केले होते. मात्र केलेला खर्च देखील या शेतकऱ्याचा वसूल न झाल्याने पूर्ण पीक खराब झाल्याने अक्षरच्या उपटून फेकण्याची वेळ या तरुण शेतकऱ्यावर आली.

 

महत्वाच्या बाबी

१. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाचा फटका
२. खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान
३. शंकर ढिकले यांनी फ्लॉवरचे पीक उपटून फेकून दिले
४. पीक लागवडीचा खर्चही निघणं आता झालं मुश्कील

 

यंदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला होता. याशिवाय, अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यानं पिकं पाण्यात गेली होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली. खरीप पिकांचे चांगलेच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. दरम्यान, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं, त्याच्या भरपाई देण्याची घोषना राज्य सरकारने केली होती. मात्र, घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या पदरात निराशच पडल्याचं चित्र आहे. अशातच दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाने अक्षरश: कहर केला. नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाल्यानं पिकांची अतोनात हानी झाली. खरंतर यावर्षी शेतकर्‍यांनी मका, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला यासह द्राक्षबागेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. त्यासाठी सोसायटी, बँका, पतसंस्था यांचेकडून कर्ज घेतले तर काही शेतकर्‍यांनी घरातील दागिने मोडून भांडवल उभे केले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावासाने येवला परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुसकासन केले.

येवला तालुक्यातील रायते गावातील तरुण शेतकरी शंकर ढिकले यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये फ्लॉवरचे पीक घेतले होते. हे पीक उभे करण्याकरता अक्षरशः या तरुण शेतकऱ्याने आपल्या पत्नीचे आणि आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून भांडवल उभे केले होते. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे पीक पूर्णपणे खराब झाल्यानेकेलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होऊ लागले आहे. या शेतकऱ्याने हे उभं फ्लॉवरचे पीक उपटून फेकून दिले आहे. आता गहाण ठेवलेले सोनं कसं सोडवावं असा मोठा प्रश्न या शेतकऱ्याला पडला. आसमानी संकटाने परत एकदा शेतकरी भरडला गेला जातोय. या शेतकऱ्याने दीड एकर शेतीमध्ये फ्लॉवरची लागवड केली होती. चांगलं उत्पन्न मिळेल, या आशाने राबराब राबत या शेतकऱ्याने संपूर्ण कुटुंबासोबत पीक घेतले. याकरता या शेतकऱ्याला भांडवल कमी पडल्याने अक्षरशः या शेतकऱ्याने पत्नी आणि आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून भांडवल उभे केले. आणि त्याद्वारे मजुरांचे तसेच औषधांचा खर्च या पिकावर केला. ज्यावेळेस पीक निघण्यास सुरुवात झाली. त्यावेळेस सतत पाऊस कोसळत कोसळला. एक दिवस सुद्धा पावसाची उघड न मिळाल्याने आलेलं फ्लावरचं पीक हे खराब होऊ लागलं. मार्केटला नेऊन देखील पैसे मिळत नसल्याने अक्षरशः या हाताश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासमोर खुरप्याच्या साह्याने पूर्ण दीड एकर फ्लॉवरचे पीक नष्ट करून फेकून दिले. पावसाचा फटका या फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्याला बसला आता जगायचं तरी कसं असा सवाल हा शेतकरी करतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!