Just another WordPress site

तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? फक्त ‘हा’ एक घरगुती आयुर्वेदीक उपचार करा अन् मिळवा शिंकापासून मुक्ती

हिवाळ्यात बदलेले थंड वातावरणामूळे शिंका येवून सर्दी, खोकल्याच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असते. तसेच सर्दीमुळेच शिंका येतात असे नाही धूळ, माती, प्रदूषण या अॅलर्जीमुळे देखील शिंका येतात. शिंक येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्याला येणाऱ्या शिंका रोखणं हे सहसा कुणालाही शक्य होत नाही. कामाच्या वेळेत किंवा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असताना जर वारंवार शिंका येऊ लागल्या, तर अनेकांना अवघडल्यासारखं वाटतं. या शिंका सहजासहजी थांबतही नाहीत. अशावेळी काय करावं असा प्रश्न सर्वांनाच पडतो. शिंका येण्यामागे अनेक कारण असू शकतात. काही जणांना ऍलर्जीमुळे शिंका येतात, काही जणांना वातावरण बदलल्यामुळे शिंका येतात तर काही जणांना मिरची, मसाले किंवा फोडणीच्या वासाने शिंका येतात. जर तुम्हाला येणाऱ्या शिंकामागे एलर्जी हे कारण असेल, तर त्यावर वैद्यकीय उपचार करून उपाय करता येतो. मात्र कुठल्याही विशिष्ट कारणांमुळे न येणाऱ्या शिंका रोखण्यासाठी काही घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरू शकतं. जाणून घेऊया असेच काही घरगुती उपाय.

 

हळदीचे दूध

हळदीचे दूध पिण्यामुळे शिंका कमी होण्यास मदत होते. हळदीत असणारे अनेक औषधी घटक इन्फेक्शन दूर करायला मदत करतात. कुठलीही जखम झाल्यानंतर त्यावर हळद लावल्यामुळे जखम बरी होण्यास मदत होते. हळदीचे दूध पिण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे शिंका कमी होऊन शरीराला आराम पडतो.

 

आल्याचा रस आणि मध

आल्याचा उपयोग सहसा जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र हळदीप्रमाणेच आल्याचा उपयोग शिंका थांबविण्यासाठीदेखील होतो. मधासोबत आल्याचा रस घेतल्यामुळे शरीरातील उष्णता वाढून शिंकांचा त्रास कमी होण्यास मदत होते. लेमन टी मध्ये एक चमचा मध घालून त्याचे सेवन केल्यास शिंका येण्याचा त्रास दूर होण्याची शक्यता असते. मात्र एका वेळी केवळ एक चमचा मधाचाच उपयोग करावा, असा सल्ला दिला जातो.

 

आंबट फळे

रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, हे देखील शिंका येण्याचे एक कारण असू शकते. त्या त्या ऋतूंमध्ये मिळणारी आंबट फळे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. स्ट्रॉबेरी, लिंबू, आवळा, संत्रे यासारख्या फळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून शिंका तर थांबतातच, शिवाय श्वासांशी संबंधित इतर विकार दूर होण्यासही मदत होते.

 

वाफ घेणे

सर्दी किंवा शिंका येणे यासारख्या आजारांमध्ये पाण्याची वाफ घेणे हा उत्तम उपाय मानला जातो. वाफ घेण्यामुळे सर्दी खोकला यासारखे आजार तर दूर होतातच शिवाय डोकेदुखी कमी होण्यासही मदत होते. वाफ घेण्यामुळे त्वचेलाही फायदा होतो आणि त्वचा अधिक तुकतुकीत होण्यास मदत होते.

 

कोमट पाणी प्या

गरम पाण्याचे सेवन केल्यास सर्दी, सर्दी या समस्येमध्ये आराम मिळतो. थंडी व थंडी असल्यास नियमितपणे थोडेसे गरम पाणी घ्या. गरम पाणी कफ अतिशीत होण्यापासून प्रतिबंधित करते आणि इतर थंड लक्षणे जसे की वारंवार शिंका येणे, नाक अडवून मुक्त करू शकते.

 

काळी वेलची

दिवसातून दोन-तीन वेळा काळी वेलची चघळल्यानेही शिंका येणे आणि अॅलर्जीमध्ये खूप आराम मिळतो. याशिवाय आले आणि तुळस दोन्ही थंडीशी लढण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. चहामध्ये आले आणि तुळस घालून सेवन केल्याने खूप आराम मिळतो.

 

निलगिरी तेल

जर तुम्हाला धूळ आणि ऍलर्जीमुळे शिंक येत असेल तर निलगिरीचे तेल खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचे काही थेंब पाण्यात टाकून तुम्ही वाफ घेऊ शकता किंवा स्वच्छ रुमाल ठेऊन त्याचा वास घेऊ शकता.

 

Disclaimer – शिंका रोखण्याच्या उपायांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!