Just another WordPress site

बायकोला नवऱ्याच्या पगाराची माहिती घेण्याचा किंवा चौकशी करण्याचा अधिकार आहे का? कसा जाणून घ्यायचा नवऱ्याचा पगार?

तुम्ही महिन्याला किती कमावता? हा प्रश्न तुमच्यासमोर कधी ना कधी आला असेल. बहुतांश लोक पगाराविषयी सार्वजनिकरित्या बोलणं टाळतात. पगाराशी निगडीत माहिती कुटुंबाला अथवा स्वत:पुरतं मर्यादित ठेवतात. मात्र, एखादा व्यक्ती लग्नाच्या बंधनात अडकला असेल तर त्याचं आयुष्य बदलून जातं. नवरा पगाराबद्दल पत्नीला माहिती शेअर करू शकतो. मात्र जर नवऱ्याने पगाराची माहिती पत्नीला दिली नाही तर पत्नी कायदेशीर मार्ग स्वीकारू शकते का? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. पत्नीला आहे पतीच्या पगाराची चौकशी करण्याचा अधिकार
२. पती हा पत्नीला पगाराची माहिती देण्यास टाळू शकत नाही
३. पती पगाराची माहिती देत नसल्यास पत्नी RTI दाखल करू शकते
४. पत्नीसारखाच पतीही करू शकतो पत्नीच्या पगाराची चौकशी

 

खरंतर वय आणि पगार कधी विचारू नये असं म्हणतात. पण तुमचा खरा पगार हा तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला माहिती असायला हवा. असं असलं तरीही पगाराबाबत विशेष कोणी बोलताना दिसत नाही. पत्नीने पतीकडे पगाराची स्लिप पाहण्याची मागणी केली तर पती नकार देऊ शकत नाही. कारण, पत्नीला पतीची सॅलरी स्लिप पाहण्याचा अधिकार आहे. घरात, कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी, हिंडताना, जेवताना किंवा केव्हाही ती आपल्या पतीकडून सॅलरी स्लिप मागू शकते. पत्नीने सॅलरी स्लिप पाहण्याची मागणी केली असता, त्यावेळी पती कडे स्पिप नसेल, तर तो नंतर दाखवू शकतो, मात्र, नकार देऊ शकत नाही. आणि नवऱ्याने नकार दिलाच तर बायको RTI चा वापर करून नवऱ्याच्या पगाराबाबतची माहिती मिळवू शकते. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलंय, ज्यात महिलने आरटीआयचा वापर करून नवऱ्याच्या पगाराची माहिती मागवली.

 

महिलेने नेमका काय पर्याय वापरला?

महिलेने सर्वात आधी नेट टॅक्सेबल इन्कम, ग्रॉस इन्कमसाठी आरटीआय दाखल केला. सुरुवातीला स्थानिक इन्कम टॅक्स ऑफिसनं सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन अधिकाऱ्यांना माहिती देण्यास नकार दिला. कारण तिचा पती यासाठी सहमत नव्हता. खंरतर RTI मध्ये पत्नीला पगाराची माहिती सहज दिली जाते. या प्रकरणात आरटीआयने पत्नीला पतीच्या पगाराचे तपशील देण्यास नकार दिला. जर हीच समस्या एखाद्याला आली तर Central Public Information Officer आणि प्रथम अपील प्राधिकरणाकडे नंतर ती व्यक्ती थेट CIC अर्थात केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज देऊ शकते आणि पतीच्या पगाराची माहिती सहज मिळवू शकते. याचाच आधार घेत महिलेने प्रथम अपील प्राधिकरणाकडे म्हणजेच FAA कडे अपील केला. FAA चा दर्जा Central Public Information Officer पेक्षा वरचा आहे. तथापि, FAA ने देखील Central Public Information Officer चा निर्णय कायम ठेवला आणि पत्नीला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे महिलेने पुन्हा केंद्रीय माहिती आयोगाला अपील केले. त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगानेने मागील आदेश, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट निर्णयाचा आढावा घेतला. एका केसमध्ये पत्नीला पतीची सॅलरी माहिती असणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं, तो तिचा अधिकार असल्याचं या केसमध्ये सांगितलं होतं. दरम्यान, या प्रकरणात केंद्रीय माहिती आयोगाने Central Public Information Officer ला १५ दिवसांच्या आत पतीच्या निव्वळ करपात्र उत्पन्न तसंच एकूण उत्पन्नाबद्दल पत्नीला माहिती देण्याचे निर्देश दिले.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पत्नी पतीचा पगार विचारू शकते. मग पती पत्नीचा पगार माहिती करून घेऊ शकतो का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. पतीलाही पत्नीप्रमाणे समान अधिकार आहे की, तो पत्नीचा पगाराविषयी चौकशी करू शकतो. आणि जर पत्नीने सांगितले नाही, तर तो RTI द्वारे त्याच्या पगाराची माहिती मिळवू शकतो. राज्यघटनेच्या कलम १४ नुसार हे शक्य आहे. ज्यामध्ये समानतेचा अधिकार आहे. त्यामुळे पती-पत्नी दोघांनाही एकमेकांचा पगार कळू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!