Just another WordPress site

शेतकऱ्यानं कमाल केली! फक्त ३० गुंठे शेतीत झेंडूचं पिक घेऊन मिळवला विक्रमी नफा

नांदेड जिल्हा हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला प्रदेश. याच जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं अवघ्या काही दिवसांत ७०ते ८० हजार रुपयांचं उत्पन्न मिळवलं. याला कारणंही असंच आहे. सध्या शेती क्षेत्रात काळानुरूप मोठे बदल होताहेत. कारण पारंपारिक शेतील खर्च बराच असल्यानं शेतकरी फळबागा आणि फुलबागांची वळू लागला. हाच कित्ता गिरवत आणि त्याला मेहनतीची जोड देत हिमायतनगरमधील शेतकरी साईनाथ चप्पलवाड यांनी झेंडूची शेती करून विक्रमी नफा कमावला.

 

महत्वाच्या बाबी

१. साईनाथ चप्पलवाड यांनी घेतले झेंडूचे विक्रमी उत्पादन
२. त्यांनी फक्त ३० गुंठे शेतीत फुलवली झेंडूची शेती
३. झेंडू लागवड करून शेतकऱ्यांपुढं आदर्श निर्माण के ला
४. अजुन दिवाळीपर्यंत चांगलं उत्पन्न मिळण्याचा त्यांना विश्वास

 

गणपती उत्सव, गौरीपूजन आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत फुलांना मागणी राहत असल्याने या संपूर्ण कालावधीत अनेक फूल उत्पादक आपल्या शेतीत लागवडीचे नियोजन करीत असतात. नांदेड जिल्ह्यातील साईनाथ चप्पलवाड हे त्यापैकीच एक शेतकरी आहेत. यंदा उत्तम नियोजनातून त्यांनी ३० गुंठ्यांतील झेंडूतून सुमारे ८० हजार रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतलयं.
तसं पाहिलं तर हिमायननगर मधील शेतकरी पावसावर येईल तेच पीक घेत असतात. शेती हेच या भागातील नागरिकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून लहरी हवामानाच्या कचाट्यात सापडलेल्या पारंपारिक शेतीमुळे येथील शेतकऱ्यांसाठी शेती करणे जिकरीचं झालं. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांकडून ही स्थिती बदलण्यासाठी शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग केले जाताहेत. इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावा, असाच एक प्रयोग साईनाथ चप्पलवाड या शेतकऱ्यानं केला.
दसरा आणि दिपावलीला झेंडूच्या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन या शेतकऱ्याने अवघ्या ३० गुंठ्यालाही कमी असलेल्या शेतीमध्ये झेंडुच्या झाडांची लागवड केली. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली. शेतकरीही मोठा हवालदिल झाला. मात्र शेतीचे योग्य नियोजन आणि बाजारपेठेतील आवक लक्षात घेऊन शेतीत चांगले उत्पादन घेतल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरते.
हे तंत्र अवलंबून या शेतकऱ्याने ३० गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूचे उत्पन्न घेतलं. पिकाला पाणी आणि लागवडीनंतर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी केली. ठिबकद्वारे झेंडूसाठी लागणारे पाणी आणि विद्राव्ये खते दिल्याने याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि फुलांमध्ये दिसून आला. लागवडीनंतर ४५ दिवसांनंतर झेंडूची फुले तोडणीस सुरुवात झाली. श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात या झेंडूच्या फुलांना चांगली मागणी वाढल्याने त्यांच्या फुलांना चांगला दर मिळाला. आतापर्यंत त्यांना या फुलांमधून ७० ते ८० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. अजुन दिवाळीपर्यंत चांगलं उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साईनाथ चप्पलवाड यांनी झेंडू पिकाच्या लागवडीसाठी ३० गुठे क्षेत्रात जवळपास १८ ते २० हजार रुपये खर्च आला. या खर्चासह त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या माळरानावरही सोने पिकवून दाखवले. त्यातून त्यांनी चांगला नफा मिळवला. तसेच उत्पादन आणि विक्रीचे योग्य नियोजन करुन शेती फायदेशीर ठरु शकते हेच त्यांनी यातून दाखवून दिले.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!