Just another WordPress site

कर्मचाऱ्यांनो, बोनसची वाट पाहताय का? बोनस कायद्यानुसार तुम्हाला ‘इतका’ बोनस मिळायला पाहिजे

आता दिवाळी जवळ आली. त्‍या अनुषंगाने बच्‍चे कंपनीला मामांच्‍या गावाचे वेध लागले तर किती तारखेपर्यंत बोनस आपल्‍या खात्‍यात जमा होईल, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलंय. मिळणाऱ्या बोनसमधून काय खरेदी करायची, याचे नियोजनही घराघरांत सुरू आहे. पण, बोनस म्हणजे काय? तो दिवाळीलाचा का मिळतो? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. दिवाळीत कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जारी करतात
२. १९६५ मध्ये देशात दिवाळी बोनस कायदा मंजूर झाला
३. वेतनाच्या ४ टक्के रक्कम बोनस म्हणून देणं बंधनकारक
४. आर्थिक वर्ष संपल्यानंतर ८ महिन्यांच्या द्यावा लागतो बोनस

 

सणासुदीचा काळ म्हणजे शॉपिंगचा, नवनवीन गोष्टी घरी आणण्याचा काळ. आणखी एका कारणासाठी या फेस्टिव्ह सीझनची वाट पाहिली जाते, ते कारण म्हणजे कंपन्या या काळात बोनस जारी करतात.

बोनस म्हणजे नक्की काय?

एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत पगाराशिवाय मिळणारी ठराविक रक्कम म्हणजे सर्वसाधारणपणे आपण बोनस असं म्हणू शकतो. असा अर्थ असला तरी अनेक कामगार संघटनांचे असं म्हणणं असतं की, बोनस म्हणजे अधिक रक्कम नसून उशिरा दिलेलं वेतनच असतं.
बोनस हा कंपनीला झालेल्या नफ्यावर अवलंबून असवा, असं म्हणणं मालकांचं होतं, तर कामगार संघाना मात्र नफा होवो अगर न होवो, किमान बोनस रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी ठाम होती. यावर मुंबई हायकोर्टाने कंपनीला नफा झाला तर त्यातील काही रक्कम कामगारांना बोनस म्हणून द्यावी, असं सांगितलं होतं. १९६२ साली याबाबत सरकारने ‘मेहेर आयोग’ नेमला. यामुळं नंतर १९६५ मध्ये बोनस कायदा मंजूर झाला.

बोनस देण्याची प्रथा कधी सुरु झाली?

भारतामध्ये पूर्वीच्या काळी राबणार्‍या कामगाराला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून दर आठवड्याला पगार दिला जात असे. मात्र इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आठवड्याऐवजी इंग्रजी महिन्याप्रमाणे पगार देण्याची प्रथा सुरू केली. भारतीयांना आठवड्याच्या पगाराच्या हिशोबानुसार ५२ आठवड्यांचा पगार मिळत होता. एका महिन्यात ४ आठवडे असतात. या नियमानुसार वर्षभराच्या पगाराची आखणी केली तर तो वर्षात १३ महिन्यांचा पगाराचा असायला हवा. मात्र इंग्रजांच्या पगार धोरणानुसार बारा महिन्याचा पगार मिळत असे. कामगारांना जेव्हा पगाराचं गणित समजलं तेव्हा महाराष्ट्रात कामगारांनी १३ महिन्यांचा पगार मिळावा याकरिता मागणी, निदर्शन करण्यात आली, इंग्रज सरकारनेही या मागणीची दखल घेतली आणि बोनस द्यायला सुरूवात केली.

बोनस कायद्यानुसार किती मिळतो बोनस?

१९६५ साली संमत झालेल्या या कायद्यात सांगण्यात आलं की, एखाद्या उद्योगसंस्थेला नफा होवो अगर ना होवो, कामगारांना त्यांच्या वेतनाच्या चार टक्के एवढी रक्कम देणं बंधनकारक आहे. १९७२ पर्यंत हा टक्का ८.३३ पर्यंत वाढवण्यात आला. ज्या कंपनीत २० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात त्या कंपनीला आपल्या कामगारांना बोनस देणे बंधनकारक आहे. तसेच हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा देखील अधिकार आहे. ज्या व्यक्तीचा पगारे २० हजार रुपये प्रती महिन्यापेक्षा जास्त आहे आणि त्याने मागच्या आर्थिक वर्षात कमीत कमी तीस दिवस काम केले आहे, त्याला कमीत कमी ८.३३ टक्के बोनस देणे बंधनकारक आहे.

बोनस दिवाळीत का दिला जातो?

बोनस कायद्यानुसार १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर आठ महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागतो. त्यामुळे कंपन्या दिवाळीच्या काळात बोनस देत असतात. दिवाळी हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा आणि अत्यंत उत्साहाचा सण आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात दिवाळीची धामधूम मोठ्या प्रमाणात असते. हा सन कर्मचाऱ्यासांठीही गोड ठरावा, म्हणून कंपन्या दिवाळीला बोनस देतात. त्यातून दिवाळी आणि बोनस हे समीकरण तयार झालं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!