Just another WordPress site

दसरा मेळाव्याचे टीझर पाहिलेत का? शिंदे आणि ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याचे टीझर प्रदर्शित

मुंबई : शिवसेना कोणाची? यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच मुंबईत ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा होणार आहे. या मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही गटांची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्यासाठीचा आपला पहिला टीझर कालच प्रदर्शित केला होता. यानंतर आता ठाकरे गटाचा पहिला टीझर समोर आला आहे. ठाकरे यांचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे. या दोन्ही मैदानांमध्ये फक्त६-७ किमीचं अंतर आहे, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी मुंबईचं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे.
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान…शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!’ असं कॅप्शन देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांचा टिझर लॉन्च केला आहे. निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे.

दुसरीकडे कालच शिंदे गटाकडूनही त्यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर लॉन्च करण्यात आला. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा पुतळा तर एकनाथ शिंदे यांचा फोटोही टिझरमध्ये वापरण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!