Just another WordPress site

गाय आणि वासराला पडली पाणीपुरीची भुरळ; मिटक्या मारत घेतला पाणीपुरीचा आस्वाद, व्हिडिओ व्हायरल

पाणीपुरी हा अनेकांचा विक पॉइंट आहे. एखाद्या रम्य संध्याकाळी तुम्ही फिरायला गेलात आणि नजरेसमोर दिसलेली पाणीपुरी खाल्ली नाही असं होणं शक्य नाही. आज देशात असंख्य पाणीपुरी किंवा चाटलव्हर दिसून येतात. मात्र, या पाणीपुरीचं वेड एखाद्या प्राण्याला असल्याचं कधी ऐकलं आहे का? कदाचित नसेलही ऐकलं. पण, सध्या सोशल मीडियावर एका पाणीपुरी लव्हर गायीचा आणि तिच्या वासराचा व्हिडीओ तुफान चर्चिला जात आहे. एखाद्या माणसाप्रमाणे हे गाय-वासरु मस्त मिटक्या मारत पाणीपुरीचा आस्वाद घेत आहेत.

 

साधारणपणे प्रत्येकानेच गायीला गवत, कडबा खातांना पाहिलं आहे. परंतु, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या गायीने तिच्या पारंपरिक खाद्याला छेद देत चक्क पाणीपुरीवर ताव मारला आहे. विशेष म्हणजे पाणीपुरी विक्रेतादेखील तितक्याच प्रेमाने या गाय-वासराच्या जोडीला पाणीपुरी भरवत आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका नेटकऱ्याने शेअर केला आहे. टू क्यूट असं कॅप्शन या युजरने व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये गायीला पाणीपुरी खाऊ घालणाऱ्या व्यक्तीला अनेकांनी रिअल हिरो म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे गाय-वासरु जराही घाई किंवा उतावळेपणा न करता आपला नंबर येण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. केवळ ४० सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून ते त्यावर मजेशीर कमेंट्सही करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!