Just another WordPress site

शाब्बास रे उंदरा! ‘या’ उंदराने वाचवले लाखो लोकांचे प्राण; कामगिरीबद्दल गोल्ड मेडलने केले सन्मानीत

उंदीर म्हणले की काय आठवतं? त्रास हो ना? म्हणजे घरात घुसून कपडे फाडणारा, अन्नधान्याची नासधूस करणारा, शेतकऱ्यांनी साठवलेले धान्य खाऊन त्रास देणारा, कागद कुरतडणारा… उंदीर करत असलेल्या नुकसानाची अशी कित्येक मोठी यादी तयार करता येईल. थोडक्यात, हा प्राणी नकोच असतो. पण जर तुम्हाला सांगितलं की, एका उंदरानं अनेकांचे प्राण वाचवले होते, तर तुमचा विश्वास नाही बसणार. पण हे खरचं घडलंय. दरम्यान, या एवढुशा उंदराने अनेकांचे प्राण वाचवले तरी कसे? याच विषयी जाणून घेऊ.

या सुपरहिरो उंदराचं नाव मगावा असं होतं. हा कोणता सामान्य उंदीर नव्हता, तर हजारो लोकांचा जीव वाचवणारा हीरो होतो. मगावा हा आफ्रिकन प्रजातीचा उंदीर होता. महत्वाची गोष्ट म्हणजे तब्बल पाच वर्ष तो कम्बोडियन आर्मिमध्ये कार्यरत होता. या काळात त्याने अनेकदा स्वत:च्या जीवावर उदार होऊन लोकांचे प्राण वाचवलेत. त्यामुळेच तो जगभरात प्रसिद्ध देखील झाला होता. मगावाला खास प्रकारचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. बेल्जिअमच्या APOPO या स्वयंसेवी संस्थेने मगावाला प्रशिक्षण दिलं होतं. ही संस्था १९९० पासून भुरुरुंगाचा शोध घेण्यासाठी जनावरांचा उपयोग करत आहे. या उंदराचा उपयोगही जेम्स बॉण्ड प्रमाणे विस्फोटकं शोधण्यासाठी केला जायचा. या उंदरांचं नाक कुत्र्यांप्रमाणेच तिक्ष्ण होतं. अन् त्याच्या याच गुणांचा वापर बॉम्ब शोधण्यासाठी केला जात असे. विशेष म्हणजे तो केवळ बॉम्ब शोधायचा नाही, तर त्यांना कुरतडून निकामी देखील करायचा. आपल्या ५ वर्षांच्या करिअरमध्ये त्याने ७१ डायनामाइंड्स आणि ३८ टाईम बॉम्ब निकामी केले होते. जर ही विस्फोटकं फुटली असती तर लाखो लोकांचे जीव गेले असते. टेनिस कोर्टच्या आकाराच्या मैदानात शोध घेण्यासाठी मगावाला फक्त २० मिनिटांचा वेळ लागायचा. एवढ्या जागेत माणसांना मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने शोध घेण्यास चार दिवस लागतील. मगावाने कंबोडियामधील जवळपास २० फुटबॉल मैदानं सामावतील इतकी जमीन भुसुरुंग मुक्त केली होती. एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भुसुरुंगामुळे १९७९ पासून आतापर्यंत ६४ हजार लोकांचा मृत्यू झाला असून २५ हजाराहून जास्त लोक अपंग झालेत. मगावामुळे भुसुरंग प्रभावित क्षेत्रातील कित्येक लोकांचा महिला, पुरुष आणि लहान मुलांचा जीव वाचला होता. त्यामुळं निवृत्तीनंतर ब्रिटीश चॅरेटीने या उंदराला सुवर्ण पदक देऊन त्याचा सन्मान देखील केला होता. कर्तृत्ववान प्राण्यांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो. हा पुरस्कार मिळवणारा मगावा पहिला उंदीर ठरलाय. मगावा २ वर्षांचा असताना आर्मिमध्ये भरती झाला होता. त्यापूर्वी एक वर्ष तो बोल्झियममध्ये ट्रेनिंग घेत होता. आपल्या कार्यकालावधीत मागवाने १.४ दशलक्ष जमिनीचा तपास केला होता. जानेवारी २०२२ मध्ये मगावा उंदराने वयाच्या ८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!