Just another WordPress site

राष्ट्रगीत सुरू असतानाच राष्ट्रपतींनी केली पँटेत केली सू; व्हिडिओ प्रसारित केल्यानं ६ पत्रकारांना अटक

President Salva Kiir Mayardit : दक्षिण सुदानचे राष्ट्रपती साल्वा कीर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये दक्षिण सुदानचे ७१ वर्षीय राष्ट्रपती एका रोड कमिशनिंग इव्हेंटमध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे असताना त्यांची राखाडी रंगाची पँट ओली होताना दिसत आहे. सुरुवातीला पँट ओली झाल्याचा छोटा काळा डाग नंतर पसरलेला दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी पँटमध्ये लघुशंका केली? की आणखी कोणत्या कारणामुळे पंत ओली झाली? याबद्दल चर्चा रंगली आहे. किर हे २०११ मध्ये दक्षिण सुदानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान राष्ट्रपतींचा हा व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपाखाली दक्षिण सुदानच्या राज्य माध्यमांच्या एकूण सहा पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ टेलिव्हिजनवर प्रसारित झाला नसला तरी सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आहे.

या घटनेबद्दल दक्षिण सुदान युनियन ऑफ जर्नलिस्टचे अध्यक्ष पॅट्रिक ओएट यांनी सांगितले की, राज्य-संचालित दक्षिण सुदान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना मंगळवारी आणि बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रपतींची पँट ओली झाल्याचा व्हिडिओ नेमका कसा समोर आला याची माहिती त्यांना असल्याचा संशय आहे,” असे त्यांनी रॉयटर्सला सांगितले. याबद्दल दक्षिण सुदानचे माहिती मंत्री मायकेल माकुई आणि राष्ट्रीय सुरक्षा सेवा प्रवक्ते डेव्हिड कुमुरी यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!