Just another WordPress site

तरुणांनो, सरकारी नोकरी शोधताय? मग दूरसंचार विभागसह ‘या’ ठिकाणी भरती सुरु, आजच करा अर्ज

गेल्या दीड वर्षात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांची पगारकपात झाली आहे तर काहींकडे नोकरी असून पगार मिळत नाही आहे.  त्यामुळं अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत.   मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘लोकहित वार्ता’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

 

जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी गुडन्यूज आहे. महावितरण, कोल्हापूर, भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय, पुणे, दूरसंचार विभाग, मुंबई आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

 

महावितरण, कोल्हापूर

पोस्ट – इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिशियनसाठी १०वी पास, वायरमनसाठी ८वी पास

एकूण जागा – १७८ (इलेक्ट्रिशियनसाठी ५१जागा, वायरमनसाठी १२७ जागा आहेत.)

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

लवकरात लवकर अर्ज करा.

तपशील – www.mahadiscom.in

 

भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय पुणे

पोस्ट – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – आयुर्वेदामध्ये पदवीधर

एकूण जागा – ३५

अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्राचार्य, आदर्श शिक्षण विकास मंडळाचे भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय, वडगाव काशिंबेग (वाळुंजवाडी), मंचर घोडेगाव रोड, ता. आंबेगाव, जि. पुणे-४१०५०३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०२२

अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in

 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर

पोस्ट – असोसिएट प्रोफेसर, रिसर्च असोसिएट

शैक्षणिक पात्रता – असोसिएट प्रोफेसर पदासाठी Ph.D., रिसर्च असोसिएटसाठी कायद्याची पदवी

एकूण जागा – ८

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी – recruitment@nlunagpur.ac.in

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – २८ ऑक्टोबर २०२२

अधिकृत वेबसाईट – www.nlunagpur.ac.in

 

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

पोस्ट – कल्याण अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहायक

शैक्षणिक पात्रता – डिग्री/ डिप्लोमा, पदवीधर, इंग्रजी ४० आणि हिंदी ३० श.प्र.मि. टायपिंग

एकूण जागा – १६

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०२२

तपशील – ispnasik.spmcil.com (या वेबसाईटवर गेल्यावर discover SPMCIL यात careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

 

दूरसंचार विभाग, मुंबई

पोस्ट – सिनियर अकाऊंटंट, ज्युनियर अकाऊंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क

शैक्षणिक पात्रता – कम्प्युटर, इंटरनेटचं ज्ञान आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

एकूण जागा – ९

नोकरीचं ठिकाण – मुंबई, गोवा, नागपूर, औरंगाबाद

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२२

तपशील – dot.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!