Just another WordPress site

धक्कादायक! मेक्सिकोमधील बारमध्ये टोळीकडून अंदाधुंद गोळीबार, ९ जणांचा जागीच मृत्यू

मेक्सिकोः मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. मेक्सिकोतील गुआनाजुआतोमध्ये हा गोळीबार झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दोन टोळींमधील संघर्ष वाढत असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे. दोन गटातील हिंसाचारात वाढ झाल्यानेच हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे. बारमध्ये झालेल्या गोळीबारात पाच पुरुष आणि चार महिलांचा मृत्यू झाला आहे.

रात्री एक टोळी बंदुक घेऊन बारमध्ये घुसला होता. यावेळी त्यांनी बारमध्ये असणाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन महिलादेखील जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

दरम्यान, अद्याप पोलिसांना हल्लेखोरांची ओळख पटलेली नाहीये. पोलिस आणि प्रशासन याप्रकरणी तपास करत असून त्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी काही पोस्टर्सही आढळली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!