Just another WordPress site

अदर पुनावाला यांना भामट्यांनी घातला तब्बल एक कोटीचा गंडा, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

अदर पुनावाला यांना भामट्यांनी घातला तब्बल एक कोटीचा गंडा, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या अदर पुनावाला यांना भामट्यांनी घातला तब्बल एक कोटीचा गंडा, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अनेकांना यातून आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागते. आता तर थेट करोना लसीचा पुरवठा करणारे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला ( Adar Poonawalla ) यांनाच भामट्यांनी तब्बल एक कोटीचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांना बिहारमधून ताब्यात घेतलं आहे.

अदर पुलावला यांचा मोबाइल नंबर हॅक करून बनावट व्हाट्सअप मेसेज पाठवले. यानंतर सिरमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठवण्यास ( Serum Institute Duped Of Rs 1 CR ) सांगितले. आरोपींनी तब्बल १ कोटी एक लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली. राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैया कुमार संभो महतो आणि रवींद्र कुमार हुबनाथ पटेल अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

सिरम कंपनीचे संचालक सतीश देशपांडे यांच्या मोबाइलवर कंपनीचे सीईओ अदर पुनावला यांच्या मोबाइल क्रमांकावरून व्हाट्सअप मेसेज आला. त्या मेसेजमध्ये काही बँक खाते नंबर देण्यात आलेली होती. त्या नंबरवर तात्काळ पैसे पाठवण्यासाठी आरोपींनी मेसेज केला होता. सात आणि आठ सप्टेंबरला आरोपीने आदर पुनावाला यांचा मोबाइल हॉक करून त्यांच्या नंबर वापरुन पैशासाठी मेसेज केला होता.

अदर पुन्हा वाला हे करोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे मालक आहेत. देशातील मोठ्या उद्योजकांना जर गंडा घातला जात असेल तर सामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणी तपास होणं आवश्यक होतं. त्यानंतर आता अदर पुनावाला यांना गंडा घालणाऱ्या या आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांनी बिहारमधून या आरोपींना अटक केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!